उत्कृष्ट लघु उद्योजकांनी पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.6 (जि.मा.का):- जिल्ह्यातील यशस्वी उद्योजकांच्या मेहनतीचे, चिकाटीचे व जिद्दीचे कौतुक करण्याच्या हेतुने जिल्हा स्तरावर उत्कृष्ट सूक्ष्म व लघु उद्योजकांसाठी जिल्हा पुरस्कार योजना सुरु करण्यात आलेली आहे.या योजनेअंतर्गत सन 2024 च्या पुरस्कारांसाठी पात्र सुक्ष्म व लघु उद्योजकांनी 30 जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले यांनी केले आहे. या योजनेअंतर्गत प्रथम पुरस्कार विजेत्यास रोख रु. 15 हजार व सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ व व्दितीय पुरस्कार विजेत्यास रोख रु. 10 हजार सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन समारंभपूर्वक गौरविण्यात येते. योजने अंतर्गत 2024 च्या पुरस्कारांकरिता अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण पात्रतेच्या अटी पुढीलप्रमाणे:- अर्जदार घटक या जिल्ह्यातील दि. 01/01/2021 रोजी किंवा त्यापुर्विचा स्थायी लघु उद्योग नोंदणीकृत, पार्ट-2 ज्ञापन स्वीकृतीधारक घटक असावा. मागील दोन वर्षे सलग उत्पादनात असावा. कोणत्याही बँकेचा अथवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.अर्जदार यापूर्वी राष्ट्रीय/अंतरराष्ट्रीय अथवा जिल्हा पुरस्कार मिळालेला नसावा. निर्याताभिमुख घटक, महिला उद्योजक, मागासवर्गीय उद्योजक यांना प्राधान्य. विहीत नमून्यातील अर्ज जिल्हा उद्योग केंद्र, सिंधुदूर्ग येथे उपलब्ध आहेत. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'