जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी, दि.13 (जि.मा.का) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील युवांनी केलेले समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने त्यांना प्रतिवर्षी जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येतो, सन 2024-25 साठी जिल्हा युवा पुरस्कारासाठी 15 जुलैपर्यंत जिल्हा क्रीडा कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे. राज्याचे युवा धोरण 2012 मधील शिफारशीच्या अनुषंगाने शासनाने जिल्हास्तरावरील युवा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतलेला आहे. जिल्हा युवा पुरस्कार तीन जणांना दिला जाणार आहे, यात युवक, युवती व नोंदणीकृत संस्था यांचा समावेश असणार आहे. युवा अथवा नोंदणीकृत संस्थानी ग्रामीण व शहरी भागात केलेले सामाजिक कार्य, समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती जमाती व जनजाती, आदिवासी भाग इ. बाबतचे कार्य, शिक्षण, झोपडपट्टी, आपत्ती व्यवस्थापन तसेच स्थानिक समस्या इ. बाबत पुरस्कार वर्षापासून गत तीन वर्षात केलेली कार्यकामगिरी या पुरस्कारांसाठी विचारात घेतली जाईल. अर्जदाराने अर्ज, आवश्यक कागदपत्रे व केलेल्या कार्याचे सबळ पुरावे बंद लिफाफ्यामध्ये 15जुलै 2025 पर्यंत कार्यालयात सादर करणे आवश्यक असणार आहे. अधिक माहितीससाठी क्रीडा अधिकारी, यांच्याशी कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुख्य प्रशासकीय इमारत, सिंधुदुर्गनगरी येथे कामकाजाच्या दिवशी संपर्क साधावा, तसेच विहित मुदतीत प्रस्ताव अर्जदाराने या कार्यालयात सादर करावा. ०००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'