आंतराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि.11 (जि.मा.का): जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांच्या माध्यमातून व जिल्हा योग संघटनेच्या सहकार्यने जिल्हा क्रीडा संकुल येथे 21 जून रोजी सकाळी 7.30 वाजता आंतराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी दिली आहे. जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्था, शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, एन.सी.सी, मेरा युवा भारत, विविध सामाजिक संस्था, औद्योगिक प्रतिष्ठाने यांनी सुध्दा आपआपल्या ठिकाणी 10 वा. आंतरराष्ट्रीय योग दिन भारत सरकारच्या आयुष्य मंत्रालयाच्या प्रोटोकॉल नुसार साजरा करावा असे आवाहन जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांच्यावतीने करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या प्रोटोकॉल बातचे सविस्तर माहिती www.ayush.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शारीरिक व अध्यात्मिक विकासासाठी योगाचे महत्व विचारात घेऊन प्रतिवर्षी दि. 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे. यानुसार प्रतिवर्षी 21 जून हा दिवस राज्यात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे. योग दिनाच्या निमित्ताने जगभरात योगासनाची परंपरा स्विकारणे व ती करणे ही आपल्या देशासाठी अभिमानाची बाब आहे. कारण योग हा आपल्या भारताच्या सांस्कृतिक वारसाचा अविभाज्य भाग आहे. ००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'