एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी दिनांक २५ (जिमाका) :- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2025-26 अंतर्गत अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती प्रवर्गाच्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज करणे आवश्यक असल्याने खरीप हंगाम लक्षात घेता १५ ते ३० जून २०२५ या कालावधीत क्षेत्रियस्तरावर गावपातळीपर्यंत विशेष मोहिम आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती प्रवर्गातील इच्छुक शेतकऱ्यांनी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेंतर्गत महाडीबीटी ऑनलाईन प्रणालीवर जास्तीत जास्त संख्येने अर्ज करुन फलोत्पादन विषयक विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले आहे.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात 'प्रथम अर्ज प्रथम लाभ' या तत्वावर लाभार्थींची निवड केली जात आहे. त्यासाठी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करण्यासाठी फार्मर आयडी असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी आपले तालुक्याच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
000000
Comments
Post a Comment