'लाडकी बहिण' योजनेंतर्गत लाभार्थी महिलांनी नागरी सहकार पतसंस्थेसाठी नोंदणी करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी दिनांक २५ (जिमाका) :- महिला व बालविकास विभागाच्या वतीने महिलांसाठी 'लाडकी बहिण योजना' राबविली जात आहे. या योजनेतील जिल्ह्यातील पात्र लाभार्थी महिलांची गांव, तालुका व जिल्हा कार्यक्षेत्र असलेली नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करता येईल. अशा प्रकारच्या संस्था स्थापन करण्यासाठी नोंदणीचे निकष पुढीलप्रमाणे आहेत -
अ.क्र.
कार्यक्षेत्र.
सभासद संख्या
भागभांडवल रुपये
1
गाव
२५०
१ लाख ५० हजार
2
नगरपालिका
५००
५ लाख
3
तालुका
५००
५ लाख
4
जिल्हा
१५००
१० लाख
महिला सहकारी पतसंस्थांचे सभासद होण्यासाठी महिला व बाल विकास विभाग यांनी प्रमाणित केलेल्या यादीत संबंधित महिला लाभार्थीचे नाव समाविष्ट असणे आवश्यक आहे. जिल्ह्यात अशा प्रकारच्या संस्था स्थापन करण्यासाठी मार्गदर्शन व सहाय्य करण्यासाठी पालक अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, कुडाळ सुनिल मरभळ, यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या दूरध्वनी क्रमांक ७७३८३५०६१४ असा आहे, देवगड तालुक्यासाठी सहकारी अधिकारी प्रेमानंद जाधव यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या दूरध्वनी क्रमांक ९४०५३९९१३० असा आहे, वैभववाडी तालुक्यासाठी सहकारी अधिकारी अभिनय विचारे, यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या दूरध्वनी क्रमांक ७०३८१३२१७० असा आहे. कणकवली तालुक्यासाठी सहकारी अधिकारी सुनिता भोगले यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या दुरध्वनी क्रमांक ९४०४७४२४२५ असा आहे. मालवण तालुक्यासाठी सहकारी अधिकारी अजय हिर्लेकर, यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या दुरध्वनी क्रमांक ९४२१२३४७४९ असा आहे, वेंगुर्ला तालुक्यासाठी सहकारी अधिकारी राजन चौगुले, यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या दुरध्वनी क्रमांक ९४०४३९५८४३ असा आहे. कुडाळ तालुक्यासाठी सहकारी अधिकारी तुषार राणे, यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या दुरध्वनी क्रमांक ८४१२९९२७२४ असा आहे, सावंतवाडी तालुक्यासाठी सहकारी अधिकारी राजन आरावंदेकर यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या दुरध्वनी क्रमांक ७०६६४३२७३५ असा आहे. व दोडामार्ग तालुक्यासाठी मुख्य लिपिक पल्लवी पई, यांची सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या दूरध्वनी क्रमांक ९९२२६०३६८६ असा आहे.
ज्या महिलांनी वरीलप्रमाणे 'लाडकी बहिण' योजनेंतर्गत महिलांची नागरी पतसंस्था नोंदवायची असेल त्यांनी जिल्हा कार्यक्षेत्राच्या संस्थेसाठी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सिंधुदुर्ग तसेच तालुका किंवा त्यापेक्षा कमी कार्यक्षेत्रासाठी संबंधित तालुका सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, सहकारी अधिकारी श्रेणी-१ यांच्या कार्यालयाकडे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांनी केले आहे.
००००००
Comments
Post a Comment