आपत्ती व्यवस्थापन काळात यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश
सिंधुदुर्गनगरी दिनांक 12 (जिमाका) :- प्रादेशिक हवामान विभागाकडून प्राप्त पूर्व सूचनेच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिनांक १२ व १५ जून २०२५ रोजी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला असून दि. १३, १४ व १६ जून २०२५ रोजी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. दि. १२ व १३ जून २०२५ रोजी जिल्ह्यात गडगडाटासह पाऊस पडण्याची, विजा चमकण्याची व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. तरी आपत्ती व्यवस्थापन काळात यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिलेले आहेत.
सदर सूचनेच्या अनुषंगाने सर्व विभागांनी पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी.
(१) प्रत्येक विभागाने आपल्या आपत्ती व्यवस्थापन प्रमाणित कार्य पद्धतीप्रमाणे काम करावे.
(२) दिनांक १२ जून ते १६ जून २०२५ या कालावधीतील अतिवृष्टी व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता
विचारात घेता रस्त्यात झाडे पडण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडू शकतात. त्यानुषंगाने बांधकाम विभाग
यांनी सतर्क राहून रस्त्यावर पडलेली झाडे वेळीच बाजूला होतील याबाबत आवश्यक ते नियोजन करावे.
त्याकरिता वूड कटर, JCB तयार ठेवावेत. तसेच रस्त्यावर दरड पडल्यास ती तात्काळ बाजूला घेण्यासाठी
Quick Response Team तयार ठेवावी.
(३) सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांनी या कालावधीसाठी हवामान विभागाकडून मच्छिमारांसाठी
प्राप्त हवामान संदेशाचे अवलोकन करून त्याप्रमाणे संदेशाचे प्रसारण मच्छिमार आणि मच्छिमार संस्था
यांच्यासाठी करावे. ज्या कालावधीत मच्छिमारांना समुद्रात जाण्यापासून अटकाव करण्यात आलेला आहे. त्या
कालावधीत मच्छिमार समुद्रात जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
(४) प्रत्येक विभाग/ कार्यालय यांनी त्यांचेकडे आपत्ती व्यवस्थापन संदर्भातील उपलब्ध साधन सामग्री सुस्थितीत
ठेवावी. शोध व बचाव पथके तयार ठेवावीत.
(५) प्रत्येकाने आपल्या भ्रमणध्वनीवर विजा पडण्याची माहिती देणारे 'दामिनी अॅप' आणि हवामान विषयक
संदेश देणारे 'सचेत अॅप' डाऊनलोड करावे.
(६) हवामान विभागाकडील प्राप्त संदेशाच्या अनुषंगाने सर्व विभागांनी सतर्क राहून परस्पर समन्वयाने काम
करावे व कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची माहिती त्वरित जिल्हा नियंत्रण कक्षाला (०२३६२)
२२८८४७/७४९८०६७८३५ या संपर्क क्रमांकावर उपलब्ध करुन द्यावी, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिली आहे.
0000
Comments
Post a Comment