आयटीआय प्रवेश २०२५ अर्ज व प्रवेश फेऱ्यांचे सुधारीत वेळापत्रक जाहीर

सिंधुदुर्गनगरी दिनांक २५ (जिमाका) :- पद्मश्री रमाकांत आचरेकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ओरोस येथे ऑगस्ट 2025 करीता मंजूर असलेल्या व्यवसायांकरिता https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर अर्ज भरण्याची प्रक्रीया 15 मे पासून सुरु झालेली आहे. अर्ज भरण्याचा अंतिम दि. 26 जून 2025 असून सुधारित वेळापत्रकानुसार अर्ज निश्चित करण्याचा अंतिम दि. 27 जून 2025 असून विकल्प सादर करण्याचा अंतिम दि.28 जून 2025 असल्याची माहिती शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य ए.एस. मोहारे यांनी दिली आहे. प्राथमिक गुणवत्ता यादी दि.28 जून 2025 रोजी संकेतस्थळावर उपलब्ध होईल गुणवत्तेबाबत कोणताही आक्षेप, हरकत असल्यास तसेच अर्जात काही बदल करावयाचा असल्यास उमेदवारांने आपल्या नजिकच्या आयटीआयमध्ये जाऊन दिनांक 29 ते 30 जून 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत हरकती नोंदवाव्यात. त्यानंतर अर्जात बदल करता येणार नाही. प्रत्येक प्रवेश फेरीच्या आदल्या दिवशी निवड यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करुन उमेदवारांना SMS द्वारे कळविण्यांत येईल. फेरीच्या दिनांकास आपल्या अर्ज, सर्व मूळ कागदपत्रे, झेरॉक्स व शुल्कासह उमेदवारांनी हजर रहावे. पहिली प्रवेश फेरी 8 ते 12 जुलै 2025, दुसरी फेरी 18 ते 22 जुलै 2025, तिसरी फेरी 28 जुलै ते 1 ऑगस्ट 2025 व चौथी फेरी 6 ते 10 ऑगस्ट 2025 या कालावधीत होणार आहे. चार प्रवेश फेऱ्यानंतर शिल्लक जागांसाठी संस्थास्तरावर समुपदेशन फेरीची कार्यवाही दि.13 ऑगस्ट 2025 पासून सुरु होणार आहे. प्रत्यक्ष समुपदेशन प्रवेश फेरी दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी होणार आहे. प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर पहावे. तरी प्रवेशोच्छुक उमेदवारांनी प्रवेश प्रक्रीयेबाबत अधिकच्या माहितीकरिता पद्मश्री रमाकांत आचरेकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ओरोस, सिंधुदुर्गनगरी-ओरोस, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग, दूरध्वनी क्र. (०२३६२) २९५८०५ अथवा भ्रमणध्वनी क्रमांक ७४४७६५७८३६, ९४२०९१०९१२ वर संपर्क साधावा. ००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'