डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटी पूर्ततेसाठी 10 जून अंतिम मुदत
सिंधुदुर्गनगरी, दि.6 (जि.मा.का): शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने विभागाच्या संकेतस्थळावर दि. १५ मार्च २०२५ पर्यंत स्विकारण्यात आलेले होते. सन २०२४-२५ मधील ज्या विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेचा अर्ज विहीत मुदतीत ऑनलाईन प्रणालीवर भरलेले आहेत. सर्व अर्जाची तपासणी कार्यालयाकडुन करण्यात आलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटीमध्ये आहेत त्यांनी मंगळवारी दि.१० जुन २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने त्रुटी पुर्तता करण्याकरीता अंतीम मुदत देण्यात येत असल्याची माहिती समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली आहे.
शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या किंवा शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतलेल्या तसेच निवास, भोजन व अन्य सुविधां अभावी पुढील शिक्षण घेऊ शकत नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विदयार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविली जाते. ११ वी १२ वी तसेच १२ नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये विविध स्तरावरील महाविद्यालयात, शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विदयार्थ्यांना शासकीय वसतिगृहातील मुलां मुलींप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणीक साहित्य व इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात येते. स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत १५ मार्च पर्यंत वाढविण्यात आलेली होती.
ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटीमध्ये आहेत त्यांनी मंगळवार दि.१० जून २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने त्रुटीपूर्तता करण्याकरीता अंतीम मुदत देण्यात येत आहे. विहीत मुदतीत त्रुटी पुर्ण करून अर्ज फेरसादर न केल्यास अर्ज अपात्र, बाद ठरतील. तसेच विद्यार्थ्यासाठी बँक तपशिल भरण्याबाबतचा टॅब उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. त्याअनुषंगाने सर्व विद्यार्थ्यांचे बँक तपशिल भरुन घेण्याच्या अनुषगाने तात्काळ कार्यवाही करावी. जर विद्यार्थ्यांना त्रुटी पुर्ण करण्यात किवा बँक खाते तपशील भरताना काही तांत्रीक अडचण येत असल्यास सहायक आयुक्त, समाजकल्याण, कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment