परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी 18 (जि.मा.का) :- शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांकरीता परदेश शिष्यवृत्तीसाठी रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी ऑफलाईन पध्दतीने 25 फेब्रुवारी अखेर अर्ज मागविण्यात येत आहे. या परदेश शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज समाज कल्याण आयुक्तालय,3 चर्च, रोड पुणे यांच्याकडे सादर करण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.
शैक्षणिक वर्ष सन 2024-25 करीता अल्पसंख्याक समुदायातिल विद्यार्थ्यांकरिता परदेश शिष्यवृत्तीसाठी ऑफलाईन पध्दतीने अर्ज www.maharashtra.gov.in या वेबसाईटवरुन अर्ज डाऊनलोड करुन तो परिपुर्ण व आवश्यक त्या कागदपत्रासह दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत पोस्टाने किंवा समक्ष "समाज कल्याण आयुक्तालय, 3 चर्च रोड, पुणे-४११००१" येथे सादर करावेत. अर्जाचा नमुना व अधिक सविस्तर तसेच योजनेचे निकषांची माहितीसाठी www.maharashtra.gov.in (जलद दुबे ताज्या घडामोडी) येथे या संकेतस्थळाला भेट द्यावी. या योजनेच्या अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग कार्यालय दूरध्वनी क्र.०२३६२-२२८८८२ येथे संपर्क साधावा.
००००००
Comments
Post a Comment