महसूल क्रीडा स्पर्धेत सिंधुदुर्ग संघ विजेता, रत्नागिरीला उपविजेतेपद; वेंगुर्ल्यात पार पडल्या स्पर्धा

सिंधुदुर्ग दि १५ (जिमाका) कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये सर्वसाधारण विजेतेपद सिंधुदुर्ग संघाने पटकावले. उपविजेतेपद रत्नागिरी संघाला, तर रायगड आणि ठाणे संघाला विभागून तृतीय क्रमांक देण्यात आला. विजेत्या संघांना कोकण विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशुख यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. विभागीय आयुक्त डॉ.राजेश देशमुख यावेळी म्हणाले की सर्व यशस्वी स्पर्धकांचे मी अभिनंदन करतो. त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो. सिंधुदुर्ग जिल्ह्याने स्पर्धेचे नियोजन उत्तम प्रकारे केले. खेळामुळे आपल्यात विचारांची देखील देवाण घेवाण झाली आहे. जिंकणं आणि हारणे महत्वाचे नाही तर खेळात सातत्य असणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्वांनी किमान अर्धा तास स्वतःसाठी काढावा. सर्वांनी आपापले छंद जोपासने आवश्यक आहे. त्यासाठी वेळ काढा असेही ते म्हणाले. वेंगुर्ला येथील कॅम्प मैदानावर गेल्या तीन दिवस सुरू असलेल्या विभागीय महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांचा समारोप आणि बक्षीस वितरण झाले. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील, ठाणे जिल्हाधिकारी किसन जावळे, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी श्री क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, महानगर पालिका आयुक्त श्री रानडे, तसेच कोकण विभागातील निवासी उपजिल्हाधिकारी उपस्थित होते. . यावेळी डॉ. देशमुख म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने अतिशय चांगल्या पद्धतीने कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे नेटके नियोजन केले आहे. स्पर्धेत कोणत्याही अधिकारी, कर्मचाऱ्यांची गैरसोय झाली नाही. राज्यस्तरावर कोकण विभागाला सर्वसाधारण विजेतेपद मिळण्यासाठी सर्वांनी यासाठी प्रयत्न करूया, असे आवाहन केले.यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, महसूल प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी खूप परिश्रम घेतले. एकत्रित काम केले तर कार्यक्रमाचे चांगले नियोजन करता येते हे यातून दाखवून दिले आहे. खेळामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहते. त्यामुळे सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी खेळाला प्राधान्य दिले पाहिजे असेही ते म्हणाले. यावेळी आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टर तहसीलदार ओंकार ओतारी यांनी क्रीडा ध्वज उतरून आयुक्तांच्या हाती सुपूर्द केला. पुढील वर्षीच्या क्रीडा स्पर्धेसाठी हा ध्वज आयुक्तांनी ठाणे जिल्ह्याकडे हस्तांतरीत केला. यावेळी मैदानावर स्वच्छता ठेवणाऱ्या नगर पालिका कर्मचाऱ्यांच्या विशेष सत्कार करण्यात आला. तसेच सर्वांची भोजनाची उत्तम व्यवस्था केल्यामुळे गौरव मुंज यांना देखील सन्मानित करण्यात आले. तसेच समालोचक अजय शिंदे आणि सर्व पंचांचा देखील सत्कार करण्यात आला. सर्वसाधारण विजेतेपद १ सिंधुदुर्ग - २८८ २ रत्नागिरी - २१८ गुण ३ रायगड आणि ठाणे (विभागून) १५५ गुण गायन विक्रांत जाधव रत्नागिरी (शाहीर ), नृत्य शरयू शिरवणकर सिंधुदुर्ग, अभिजीत फुले ,ठाणे (वेशभूषा), विनायक परदेशी, रायगड (नक्कल ), सचिन धोंडगे (पखवाज), मयुरी वाढू (चित्रकला ) पालघर , संतोष बांदेकर सिंधुदुर्ग (निवेदन) , मुंबई उपनगर आणि रत्नागिरी (विभागून) (समूह गायन), मुंबई शहर (नृत्य ) आणि (नाटिका), Duet dance ठाणे जिल्हा (गाणे - जोगवा ) Duet गायन मुंबई उपनगर, सांस्कृतिक स्पर्धा (सर्वसाधारण) १ मुंबई उपनगर २ ठाणे जिल्हा ३ पालघर जिल्हा क्रिकेट १ रत्नागिरी २ ठाणे ३ सिंधुदुर्ग कब्बडी १ रत्नागिरी २ रायगड ३ सिंधुदुर्ग व्हॉलीबॉल १ रत्नागिरी २ ठाणे ३ सिंधुदुर्ग फुटबॉल १ सिंधुदुर्ग २ रत्नागिरी ३.रायगड खो - खो (महिला) १ सिंधुदुर्ग २ रत्नागिरी ३ मुंबई उपनगर खो - खो (पुरुष) १ सिंधुदुर्ग २ ठाणे ३ पालघर थ्रो बॉल (महिला) . १ रत्नागिरी २ ठाणे ३ सिंधुदुर्ग संचलन . १ सिंधुदुर्ग २ ठाणे ३ रत्नागिरी उत्कृष्ट खेळाडू सौरभ सांबारे (सिंधुदुर्ग) रुकसाना मुल्ला (रत्नागिरी) ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'