संत शिरोमणी श्री संत रोहिदास महाराज जयंती साजरी
सिंधुदुर्गनगरी 18 (जि.मा.का) :- संत राहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या वतीने जिल्हा कार्यालय, सिंधुदुर्ग येथे संत शिरोमणी श्री संत रोहिदास महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी समाजकल्याण विभागचे लेखाधिकारी उदयकुमार यादव यांच्या हस्ते श्री संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या रिध्दी शरद केरकर तसेच समाजकल्याण विभाग, महात्मा फुले मागसवर्ग आर्थिक विकास महामेंडळ, दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, शामराव पेजे कोकण आर्थिक मागास विकास महामंडळ तसेच वसंतराव नाईक वित्त व विकास महामंडळाचे तसेच वसंतराव नाईक वित्त व विकास महामंडळाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
०००००
Comments
Post a Comment