" डॉ. झाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजने"साठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी 17 (जि.मा.का) : अल्पसंख्यांक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडून मुस्लिम समाजाच्या विकासासाठी " डॉ. झाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजना" सन 2024-25 मध्ये राबविण्यात येत आहे. या योजनासाठी 22 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे. राज्यातील धर्मादाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील मदरशांनी विहित अटी व शर्तीची पूर्तता करुन सन 2024-25 या वर्षाकरीता विहित नमुन्यातील अर्जासह परिपूर्ण प्रस्ताव शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक) यांच्यामार्फत जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्याकडे दि. 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत सादर करावेत. या प्रस्तावमध्ये water purifler व Solar Inverter या 2 पायाभूत सोयी सुविधांचा प्रामुख्याने उल्लेख करण्यात यावा. विहित अर्जाचा नमुना याबाबतचा अधिक तपशील शासन निर्णय क्र. अविवि-2010/ प्र.क्र.152/10/का.6, दि. 11/10/2013 मध्ये उपलब्ध आहे. विहित मुदतीनंतर प्राप्त अर्जाची दखल घेण्यात येणार नाही. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'