देवगड येथील शासकीय विश्रामगृहाचे उद्घाटन नुतन शासकीय विश्रामगृह पर्यटनवाढीसाठी महत्वाचे - पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी दिनांक 26 (जिमाका वृत्त) : सर्वसामान्यांच्या करातून उभारलेल्या शासकीय निधीचे नियोजन कसे आसावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे देवगड येथील विश्रामगृह आहे. कणकवली येथील विश्रामगृह देखील कौतुकास्पद आहे. आपला जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने देवगड येथील हे विश्रामगृह पर्यटनवाढीसाठी महत्वाचे ठरणार असल्याचे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले. देवगड शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या शासकीय विश्रामगृहाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार श्री गोगटे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड आदी उपस्थित होते. विश्रामगृहातील अंतर्भुत बाबी- सुसज्ज स्वागत कक्ष, २ व्ही.व्ही. आय.पी कक्ष अँन्टी चेंबरसहित, ३ व्ही.आय.पी. कक्ष (एसी सहित), मिटींग रुम, प्रशस्त लॉबी, विस्तीर्ण वाहनतळ, अग्निरोधक कार्यप्रणाली आणि सीसीटीव्ही सुरक्षा कार्यप्रणालीचा समावेश आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'