जिल्हा पुरस्कार योजनेंसाठी 7 मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 21 (जिमाका) :- जिल्ह्यातील यशस्वी उद्योजकांच्या मेहनतीचे, चिकाटीचे व जिद्दीचे कौतुक करण्याच्या हेतून जिल्हा स्तरावर उत्कृष्ट सुक्ष्म व लघु उद्योजकांसाठी जिल्हा पुरस्कार योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेअंतर्गत सन 2024 च्या पुरस्कारांसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत अर्जाची मागणी केली होती. या पुरस्कारसाठी 7 मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची, माहिती जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक श्रीपाद दामले यांनी केले आहे. या योजनेअंतर्गत प्रथम पुरस्‍कार रोख रु.15 हजार आणि व्दितीय पुरस्‍कार रोख रु. 10 हजार सन्‍मानचिन्‍ह, शाल व श्रीफळ देऊन समारंभपूर्वक गौरविण्‍यात येणार आहेत. पुरस्‍कार करण्यासाठी अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहे. १) अर्जदार घटक जिल्ह्यातील दि. ०१/०१/२०२१ रोजी किंवा त्‍यापुर्विचा स्‍थायी लघु उद्योग नोंदणीकृत / पार्ट-२ ज्ञापन स्‍वीकृतीधारक घटक असावा. २) अर्जदार घटक मागील दोन वर्षे सलग उत्‍पादनात असावा. ३) अर्जदार घटकास कोणत्‍याही बॅंकेचा अथवा वित्‍तीय संस्‍थेचा थकबाकीदार नसावा. ४) अर्जदार घटक यापूर्वी राष्‍ट्रीय / अंतरराष्‍ट्रीय अथवा जिल्‍हा पुरस्‍कार मिळालेला नसावा. ५) निर्याताभिमुख घटक / महिला उद्योजक / मागासवर्गीय उद्योजक यांना प्राधान्‍य. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत यापूर्वी दि. १५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत ठेवण्यात आलेली होती. परंतु अधिकाधिक अर्ज प्राप्त होऊन जास्तीत जास्त उद्योजनांना या पुरस्कारासाठी अर्ज करण्याची संधी प्राप्त व्हावी याकरीता, अर्ज करण्याची मुदत दि. ७ मार्च २०२५ पर्यत वाढविण्यात आलेली आहे. तरी पात्रता पुर्ण करणाऱ्या जिल्ह्यातील सुक्ष्म व लघु उद्योजकांनी या पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्रमार्फत करण्यात येत आहे. ०००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'