जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांनी ई –केवायसी 15 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 3 (जि.मा.का.) : जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या एकूण 6लाख 57 हजार 898 लाभार्थ्यांपैकी अद्यापर्यंत 43 टक्के लाभार्थ्यांचे ई- केवायसी पूर्ण झालेली नाही. ज्या लाभार्थ्यांची अद्यापही ई- केवायसी झालेली नाही, अशा लाभार्थ्यांची ई -केवायसी पूर्ण करण्यासाठी रास्तभाव धान्य दुकान स्तरावर विशेष मोहिम अंतर्गत कँम्पचे आयोजन करण्यात आलेले आहे. ई -केवायसी न झलेल्या लाभार्थ्यांनी संबंधित रास्तभाव धान्य दुकानदार यांच्याशी त्वरीत संपर्क साधून दि. 15 फेब्रुवारी 2025 पर्यंत ई- केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यातील रास्त भाव धान्य दुकानांमध्ये अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण करण्यात येते. या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणिकरण करणे व शिधापत्रिकेसोबत संलग्न करण्यात आलेल आधार क्रमांक बरोबर असल्याचे तसेच शिधापत्रिकेमध्ये नमूद केलेली व्यक्ती त्याच आहेत याची खात्री करण्यासाठी ई -केवायसी करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. त्याव्दारे आधार क्रमांक संलग्न शिधापत्रिकेमध्ये नमूद योग्य व्यक्ती असल्याची खात्री होणार आहे. ००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'