युवा पुरस्कारासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 3 (जि.मा.का.) : राज्य युवा पुरस्कार सन 2023-24 साठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवा व युवा विकासाचे कार्य करणाऱ्या संस्थांनी या पुरस्कारासाठी दि. 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे. राष्ट्र व राज्य निर्माणामध्ये युवकांनी महत्वपूर्ण भूमिका असून मोठ्या संख्येने युवा वर्ग, संस्था राज्यात सामाजिक कार्य करीत आहेत. युवामध्ये असलेल्या सुप्तगुणांचा वाव देणे, त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याला प्रोत्हासन देणे, त्यांचा गुणगौरव करणे आवश्यक आहे. राज्याचे युवा धोरण अंतर्गत युवांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी राज्य युवा पुरस्कार शासन निर्णया नुसार देण्यात येतात. सन 2023-24 या वर्षात राज्यस्तरावर राज्य युवा पुरस्कार क्रीडा विभागाच्या क्षेत्रिय विभागस्तर नुसार प्रत्येक विभागातील 1 युवक, 1 युवती व 1 नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येणार आहेत. या पुरस्काराचे स्वरुप युवक- युवती यांना रोख रु. 50,000/- संस्थेस रु. 1,00,000/- तसेच गौरवपत्र, सन्मानचिन्ह असे राहणार आहे. राज्य युवा पुरस्कारसाठी युवक अथवा युवा विकासाचे कार्य करणाऱ्या संस्था यांची गत तीन वर्षामध्ये केलेल्या कामगिरीचे मुल्यांकन विचारात घेण्यात येणार असून राज्य युवा पुरस्कार सन 2023-24 साठी अर्ज दि. 15 फेब्रुवारी 2025 रोजी पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करणे आवश्यक राहणार आहे. अर्जाचा नमुना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय किंवा https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध राहतील. राज्यातील जास्तीत जास्त युवा व युवा विकासाचे कार्य करणाऱ्या संस्थांनी या पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन राज्य शासनाचे क्रीडा व युवक सेवा, संचालनालयाचे आयुक्त यांनी केले आहे. ०००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'