जिल्ह्यातील एकविध क्रीडा संघटनांनी क्रीडा गुण सवलतीकरीता स्पर्धा अहवाल सादर करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दि.20 (जि.मा.का):- जिल्ह्यातील जिल्ह्यास्तरावरील एकविध क्रीडा संघटनांनी सन २०२४-२५ या वर्षात आयोजित झालेल्या क्रीडा स्पर्धेचे रेकॉर्ड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास दि.१० मार्च २०२५ पर्यंत उपलब्ध करून देण्यात यावे. त्यानुसार पात्र खेळाडू विद्यार्थी क्रीडा गुणांपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यातील एकविध क्रीडा संघटनांनी आपल्या क्रीडा स्पर्धेचे रेकॉर्ड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास हस्तेपोच अथवा कार्यालयाच्या sindhusports@yahoo.com या ई मेल आयडीवर सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, यांनी केले आहे. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १० वी व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबत शासनाने निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार संबंधित खेळ संघटनांनी विविध स्तरावर पार पडलेल्या स्पर्धांचे रेकॉर्ड जिल्हा क्रीडा अधिकारी यांना सादर करणे आवश्यक आहे. तथापि बऱ्याच एकविध खेळ संघटनांद्वारा संबंधित स्पर्धाचे रेकॉर्ड फक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालयाकडे सादर केले जात असल्याने जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या संबंधित खेळातील खेळाडूंचे क्रीडा गुण मिळण्यासाठीचे प्रस्ताव पडताळणी करून पात्र खेळाडूंना क्रीड़ा गुणांची शिफारस करणे शक्य होत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा क्रीडा गुण सवलतीस पात्र असूनही अनेक खेळाडू विद्यार्थी क्रीडा गुण सवलतीपासून वंचित राहतात. ००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'