राष्ट्रीय युवा स्वयंसेवकांसाठी 8 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी, दि. 3 (जि.मा.का.) : नेहरु युवा केंद्र ही भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी एक स्वायत्तशासी संस्था आहे. राष्ट्रीय युवा स्वयंसेवकांसाठी प्रत्येक तालुकासाठी 3 प्रमाणे, एकूण 24 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी दि. 8 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी यांनी केले आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे 1 जानेवारी 2025 रोजी वयोमर्यादा 18 ते 29 वर्षे आहे. अर्जदार किमान पदवी शिक्षण घेणारा पदवीधर, पदव्युत्तर असावा. मानधन दरमहा रु.5000/- असेल. या कालावधी जास्तीत जास्त तीन महिने आणि किमान 15 दिवसांचा असेल. उमेदवार ज्या तालुकासाठी अर्ज करत आहे, त्या तालुक्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. ज्या उमेदवारानी ह्यापूर्वी NYV ह्या पदावर काम केले आहे त्यानी अर्ज करू नयेत. अर्जदार कुठेही नोकरी करत नसावा. ही पगाराची नोकरी नाही किंवा स्वयंसेवक कायदेशीररित्या सरकारकडून कोणत्याही प्रकारच्या रोजगाराचा दावा करण्यास पात्र नसेल. मुलाखतीचा दिनांक आणि वेळ ई-मेल आणि फोन च्या माध्यमातून कळविण्यात येईल.
योजनेची माहिती ऑनलाईन अर्ज नेहरु युवा केंद्र संगठन च्या www.nyks.nic.in या वेबसाईटवर दिली आहे, (लिंक: https://nyks.nic.in/nycapp/main.asp ) आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 8 फेब्रुवारी 2025 असेल. अधिक माहिती करीता नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग येथे कार्यालयीन वेळेमध्ये (सकाळी 10 ते सायं 5) संपर्क:- 02362-295012/9176093429/94212 67011/9404438050 या क्रमांकावर संपर्क साधावा.
भारत सरकार तरुणांना 'डिजिटल कृषी मिशनच्या अंमलबजावणीमध्ये सहभागी करून घेऊ इचिऊत आहे. तसेच युवाना स्वयंसेवी मटामध्ये संघटित करून त्यांची ऊर्जा आणि क्षमता राष्ट्र उभारणीच्या कार्यासाठी वापरण्यासाठी उत्सुक आहे. तुम्हाला आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, लिंगभेद आणि इतर सामाजिक समस्यांवर आधारित मोहिमा जागरुकता कार्यक्रमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्यास सांगितले जाऊ शकते आणि आपत्कालीन परिस्थितीत आवश्यकतेनुसार विविध कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाला मदत करण्यास सांगितले जाऊ शकते.
००००००
Comments
Post a Comment