जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीची सभा संपन्न
सिंधुदुर्गनगरी, दि.20 (जि.मा.का.) : जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीची सभा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाली.
या बैठकीत अनु. जाती – जमाती (अ.प्र) अधिनियम 1989 अन्यवे घडलेल्या दि.1 एप्रिल 1995 ते 8 सप्टेंबर 2024 या कालावधीत एकूण 198 गुन्ह्यांपैकी सद्यस्थितीत पोलीस तपासावर असलेले गुन्हे -0 न्यायालयीन प्रलंबित गुन्हे- 57 व इतर गुन्ह्यांचा आढावा पोलीस विभाग व नागरी हक्क संरक्षण शाखा, सिंधुदुर्ग याच्याकडून बैठकीत घेण्यात आला. तसेच या कायद्यातंर्गत प्रलंबित प्रकरणांतील पीडीत व्यक्तीना 100 टक्के अनुदान माहे सप्टेंबर 2024 मध्ये प्राप्त झालेल्या निधीतून वाटप करण्यात आले असल्याचे समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी माहिती दिली.
या कायद्यातंर्गत घडलेल्या गुन्ह्यातील प्रकरणातील पात्र सर्व अत्याचार पीडीत व्यक्तींना अर्थसहाय्यचा 100 टक्के अनुदान समाज कल्याण विभागाकडून PFMS SNA व्दारे वाटप करण्यात आलेला आहे.
या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस विभाग व नागरी हक्क संरक्षण शाखा, समाज कल्याण विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच इतर सदस्य आदी उपस्थित होते.
०००००
Comments
Post a Comment