पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा
सिंधुदुर्गनगरी, दि.23 (जि.मा.का.) : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे दि. 25 ते 27 सप्टेंबर 2024 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
बुधवार दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9.30 वाजता केसरी ता. सावंतवाडी येथून ओरोस जि.सिंधुदुर्गकेडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वाजता "जनता दरबार" (कणकवली – देवगड- वैभववाडी विधानसभा मतदारसंघ) कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ :- जिल्हा नियोजन समिती सभागृह ओरोस,जि. सिंधुदुर्ग. दुपारी 3 वाजता ओरोस येथून केसरी ता. सावंतवाडीकडे प्रयाण. दुपारी 4.30 वाजता केसरी ता. सावंतवाडी येथे आगमन व राखीव .
गुरुवार दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9.30 वाजता केसरी ता. सावंतवाडी येथून ओरोसकडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस, सिंधुदुर्ग येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वाजता "जनता दरबार" (कुडाळ – मालवण विधानसभा मतदारासंघ) कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ :- जिल्हा नियोजन समिती सभागृह ओरोस सिंधुदुर्ग. दुपारी 2.30 वाजता ओरस येथून सावंतवाडीकडे प्रयाण. दुपारी 4 वाजता सावंतवाडी येथे आगमन व सावंतवाडी तालुकयातील 11 जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना मोफत रुफ टॉप सोलार वीज निर्मिती संच साहित्य वितरण कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ:- काझी शहाबुद्दीन हॉल सावंतवाडी. सायं. 5 वाजता रुग्णवाहिका लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ :- सावंतवाडी. सायं. 6.30 वाजता सावंतवाडी येथून मोटारीने केसरी ता.सावंतवाडीकडे प्रयाण सायं. 7.30 वाजता केसरी ता. सावंतवाडी येथे आगमन व राखीव.
शुक्रवार दिनांक 27 सप्टेंब 2024 रोजी सकाळी 8.45 वाजता केसरी येथून सावंतवाडीकडे प्रयाण. सकाळी 9 वाजता सावंतवाडी येथे आगमन व "ग्रँड मास्टर चोआ कॉक् सुई फिरते वैद्यकीय पथक" लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ:- बँक्वेट हॉल, राजवाडा ता. सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग. सकाळी 10 वाजता सावंतवाडी येथून ओरोसकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता "जनता दरबार" (सावंतवाडी- वेंगुर्ला विधानसभा मतदारसंघ) कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ :- जिल्हा नियोजन समिती सभागृह ओरोस सिंधुदुर्ग. दुपारी 3 ओरोस सिंधुदुर्ग येथून मोपा, विमानतळ गोवाकडे प्रयाण.
००००००
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली 'जनता दरबार'चे आयोजन
25 ते 27 सप्टेंबर दरम्यान आयोजन
नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी दि 23 (जिमाका):- सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न तात्काळ सोडविणे, जनता व प्रशासन यांच्यामध्ये समन्वय साधणे तसेच जनतेच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करणे अशा विविध समाजोपयोगी हेतुसाठी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून ऑगस्ट महिन्यात 'जनता दरबार' चे आयोजन करण्यात आले होते. या जनता दरबाराला सामान्य नागरिकांचा मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता 25 ते 27 सप्टेंबर दरम्यान पुन्हा एकदा पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 'जनता दरबाराचे आयोजन करण्यात आलेले आहे. हा जनता दरबार सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस- सिंधुदुर्ग येथे पार पडणार आहे.
दि 25 सप्टेंबर रोजी कणकवली विधानसभा क्षेत्रातील कणकवली, देवगड व वैभववाडी या तालुक्यातील नागरिकांच्या तक्रारी स्विकारल्या जाणार आहेत. दि. 26 सप्टेंबर रेाजी कुडाळ विधानसभा क्षेत्रातील कुडाळ व मालवण आणि दि 27 सप्टेंबर रोजी सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातील सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग तालुक्यातील नागरिकांच्या तक्रारी स्विकारल्या जाणार आहेत. जनता दरबारामध्ये उपस्थित होणाऱ्या तक्रारी, अडचणींचे निराकरण करण्याच्या दृष्टीने जबाबदार अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी नागरिकांनी जनता दरबारामध्ये आपल्या तक्रारी सादर करण्याचे आवाहन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले आहे.
०००००००
Comments
Post a Comment