शौर्य दिनाचे 29 सप्टेंबर रोजी आयोजन
सिंधुदुर्गनगरी, दि.१७ (जि.मा.का.) : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यातील शहीद जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता व माजी सैनिकांचा सन्मान करण्यासाठी दि.२९ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता सैनिकी मुलांचे वसतिगृह, सावंतवाडी येथील मल्टी पर्पज हॉल येथे" शौर्य दिन" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील शहीद जवानांच्या वीरनारी, वीरमाता, वीरपिता, माजी सैनिक व माजी सैनिक विधवा पत्नी, यांनी "शौर्य दिन" साजरा करण्यासाठी सावंतवाडी येथील सैनिकी मुलांचे वसतिगृह येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. ०२३६२ २२८८२०, ९३२२०५१२८४ वर संपर्क करावा.
०००००००
--
Comments
Post a Comment