ओरोस शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी दि 24 (जिमाका):- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ओरोस, येथे शुक्रवार 27 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या मेळाव्याचे आयोजन करण्यांत आलेले असल्याची माहिती शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्राचार्य ए.एस. मोहारे यांनी दिली आहे.
राज्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु केलेली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील विविध आस्थापना, कंपन्या, सोसायट्या शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच खाजगी संस्था इत्यादीमध्ये सहा महिन्यांसाठी कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप) देण्यांत येणार आहे.
या मेळाव्यामध्ये योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या आस्थापना, कंपन्या, सोसायटयांनी त्यांच्या नोंदणी संदर्भातील कागदपत्रे त्यांच्याकडे भरावयाच्या जागांच्या तपशिलासह मेळाव्यास उपस्थित रहावे. त्याप्रमाणे ज्या बेरोजगारांनी या योजनेखालील नोंदणी केलेली आहे अशा बेरोजगारांनी देखील या मेळाव्यास उपस्थित रहावे.
विविध आस्थापनाकडील रिक्त जागा बेराजगार उमेदवारांमधून सहा महिन्याच्या कालावधीकरिता कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप) म्हणून भरण्यांत येणार आहेत. या मध्ये 12 वी उत्तीर्ण उमेदवार असल्यास महिना रु. 6 हजार, आयटीआय अथवा पदाविका प्रशिक्षण उत्तीर्ण असल्यास महिना रु. 8 हजार तसेच पदवीधर अथावा पदव्युत्तर उत्तीर्ण असल्यासन रु.10 हजार एवढे मानधन शासनाकडून मिळणार आहे. सर्व आस्थापना, कंपन्या व बेरोजगार युवक-युवती उमेदवारांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ओरोस, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग येथे उपस्थित रहावे, असे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्राचार्य ए.एस.मोहारे यांनी केले आहे.
००००००
Comments
Post a Comment