परदेश शिष्यवृती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी, दि.5 (जि.मा.का.) : जिल्ह्यातील परदेशात शिक्षण घेत असलेल्या अल्पसंख्याक समुदायातिल विद्यार्थ्यांकरीता परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी परदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत सन 2024-25 करीता पात्र विद्यार्थींनी अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.
अल्पसंख्याक विकास विभागाअंतर्गत अल्पसंख्याक समुदायातिल विद्यार्थ्यांकरीता परदेशात शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते.
सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरीता अल्पसंख्याक समुदायातिल विद्यार्थ्यांकरीता परदेश शिष्यवृत्तीसाठी ऑफलाईन पध्दतीने अर्ज www.maharashtra.gov.in (जलद दुवे- ताज्या घडामोडी) येथे नमुद वेबसाईटवरुन अर्ज डाऊनलोड करुन तो परिपुर्ण व आवश्यक त्या कागदपत्रासह 6 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 6.15 वाजेपर्यत पोस्टने किंवा समक्ष समाज कल्याण आयुक्तालय, 3 चर्च रोड, पुणे 411001 येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय 02362 228882 वर संपर्क साधावा.
००००००
Comments
Post a Comment