काजु बी अनुदान योजनेस 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी, दि.4 (जि.मा.का.): राज्यातील काजु उत्पादक शेतकऱ्यांना काजु बी साठी शासनाकडून वित्तिय सहाय्य उपलब्ध करुन दिल्यास, काजू उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्यास मदत होईल, ही बाब विचारात घेवुन सन 2024 च्या काजु हंगामासाठी काजु उत्पादनाकरिता शासनाने राज्यातील काजु उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजु बी शासन अनुदान योजना कार्यान्वीत केली होती. या योजनेला दि. 30 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अनुदान योजनेचा लाभ राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य काजू मंडळ तथा कार्यकारी संचालक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम यांनी केले आहे. काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बी साठी शासन अनुदान देणे या योजनेची अंमलबजावणीची प्रक्रिया पणन मंडळाच्या www.msamb.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अनुदान मागणीसाठी विहीत नमुन्यातील अर्ज, संमतीपत्र, 7/12, कृषि खात्याचा दाखला, जी.एस.टी.बील, बँक तपशिल, आधार कार्ड, हमीपत्र इ. कागदपत्रे अनुदान मागणीसाठी आवश्यक आहेत. अधिक माहीतीसाठी महाराष्ट्र राज्य काजू मंडळाचे उपविभागिय कार्यालय, शांतीनगर, नाचणे, जि. रत्नागिरी यांचेशी संपर्क साधावा. अथवा कृषि व्यवसाय पणन तज्ञ पवन बेर्डे, (७२१८३५००५४) यांचेशी संपर्क साधावा. अर्ज प्राप्त करणे तसेच जमा करण्याची सुविधा कुडाळ सुविधा केंद्र, MIDC कुडाळ, हापुस आंबा निर्यात सुविधा केद्र जामसंडे ता. देवगड या ठिकाणी करण्यात आली आहे. ०००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'