गणेशोत्सव शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी वाहतूक नियोजनाची अंमलबजावणी करा
सिंधुदुर्गनगरी, दि.4 (जि.मा.का.): गणेशोत्सव शांततेत, सुरळीत व भक्तीमय वातावरणात पार पाडण्यासाठी वाहतूक नियोजनाबाबत निर्गमित केलेल्या आदेशाचे अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी केले आहे.
दिनांक 7 सप्टेंबर 2024 रोजी पासुन राज्यात गणेशोत्सवास सुरवात होणार आहे. गणेशोत्सवाकरीता मुंबई, पुणे तसेच इतर जिल्हे व राज्यामधून चाकरमानी कुटुंबासह आपल्या मुळ गावी रेल्वे, बसेस व खाजगी वाहनाने मोठ्या संख्येने येतात. त्यावेळे ये-जा करणाऱ्या चाकरमानी प्रवाशांना प्रवासात कोठेही गैरसोय होऊ नये, वाहतूक कोंडी होऊ नये, प्रवास सुरळीत व सुरक्षित व्हावा यासाठी दरवर्षी शासन व जिल्हा पोलीस दलाचे वतीने जिल्ह्यातील राष्ट्रीय, राज्य मार्गावर आवश्यकतेनुसार फिक्स पॉईट, पेट्रोलिंग नेमून वाहतुकीचे नियोजन करण्यात येते.
सन 2024 चा गणेशोत्सव शांततेत व सुरळीत पार पडावा, प्रवाशांना/ चाकरमान्यांना वाहतुकीचा कोणताही त्रास होऊ नये, प्रवास वेळेत व सुरक्षित व्हावा याकरीता महाराष्ट्र शासनाकडून कोकणवासीयांच्या सोयीसाठी पनवेल ते इन्सुली (सिंधुदुर्ग) राष्ट्रीय महामार्ग क्र.66 (रा.म.क्र. जुना क्र.17) वरुन होणाऱ्या अवजड वाहतुकीचे निर्बंधाबाबत पुढीलप्रमाणे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत.
1.) गणेशोत्सवाच्या पूर्ण तयारीचा प्रवास/ मुर्तीचे आगमन दि. 5 सप्टेंबर रोजी 00.01 पासून ते दि. 8 सप्टेंबर रोजी रात्री 23 वाजेपर्यंत या कालावधीत मुंबई – गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वर सर्व वाहन ज्या वाहन क्षमता 16 टन किंवा 16 टनापेक्षा जास्त आहे. (जड -अवजड वाहने, ट्रक,मल्टीएक्सल, ट्रेलर इ. वाहने) त्यांना वाहतुकीस पुर्णता बंद करण्यात यावी.
2.) 5 व 7 दिवसाच्या गणपतीचे विसर्जन, गौरी गणपती विसर्जन काही अंशी परतीचा प्रवास दि.11 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 8 वाजेपासून ते दि.13 सप्टेंबर रोजी रात्री 23 वाजेपर्यंत या कालावधीत मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वर सर्व वाहने ज्यांची वाहन क्षमता 16 टन किंवा 16 टनापेक्षा जास्त आहे. (जड अवजड वाहने, ट्रक, मल्टी एक्सल, ट्रेलर इ. वाहने) अशा सर्व वाहनांची वाहतुक पुर्णता बंद करण्यात यावी.
3.) अनंत चर्तुदशी 11 दिवसाचे गणपती विसर्जन परतीचा प्रवास दि.17 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपासुन ते दि.18 सप्टेंबर रोजी रात्री 20 वाजेपर्यंत या कालावधीत मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वर सर्व वाहने ज्यांची वाहन क्षमता 16 टन किंवा 16 टनापेक्षा जास्त आहे. (जङ-अवजड वाहने, ट्रक, मल्टीएक्सल, ट्रेलर इ. वाहने) अशा सर्व वाहनांची वाहतुक पुर्णता बंद करण्यात यावी.
अनुक्रमांक 1 ते 3 नुसार राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वर संपूर्ण प्रवास बंदी असलेल्या कालावधी व्यतिरीक्त उर्वरीत कालावधीत अभी वाहने, ज्यांची वाहन क्षमता 16 टन किंवा 16 टनापेक्षा जास्त आहे. (जड-अवजड वाहने, ट्रक, मल्टी एक्सल, ट्रेलर इ. वाहने) अशा वाहनांना दिनांक 8 सप्टेंबर 2024 रोजी 23 वाजेपासून ते दि.11 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत व दि. 13 सप्टेंबर रोजी रात्री 23 वाजेपासून ते दि.17 सप्टेंगर रोजी स.8 वाजेपर्यंत या वेळेत वाहतुकीस परवानगी राहील. तसेच सर्व वाहने दि. 18 सप्टेंबर रोजी रात्री 20 वाजेनंतर नियमित प्रवास करतील.
परंतु, वरील निबंध बंदी दुध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गैस सिलेंडर, लिक्वीड मेडीकल ऑक्सीजन, अन्न धान्य, भाजीपाला व नाशवंत माल इ. जीवनावश्यक वस्तु वाहून नेणाऱ्या बाहनांना लागू राहणार नाही. तसेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.66 च्या रस्ता रुंदीकरण/ रस्ता दुरुस्ती कामकान आणि साहीत्य, माल इ. ने-आण करणाऱ्या वाहनांना बंदी लागू राहणार नाही. यासंदर्भात वाहतूकदारांना संबंधित वाहतुक विभाग / महामार्ग पालीस यांनी प्रवेश पत्र देणे आवश्यक आहे.
गणेशोत्वसव काळात वाहतूक नियोजनाकरीता महाराष्ट्र शासनाने वरील प्रमाणे आदेश निर्गमित केलेले असून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वरुन दि.5 सप्टेंबर ते दि.18 सप्टेंबर 2024 रोजीचे मुदतीत प्रवास करणाऱ्या सर्व वाहनधारक, वाहन चालकांनी शासनाने दिलेल्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे. जड अवजड वाहनांना बंदी घातलेल्या दिनांक व कालावधीत त्यांनी महामार्गावरुन प्रवास, वाहतुक करु नये. वाहनधारका, वाहन चालक यांनी शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करुन गणेशोत्सव काळात वाहतुक नियोजनाकरीता सहकार्य करावे असे आवाहन पोलीस दलाकडून करण्यात येत आहे.
तसेच गणेशोत्सव काळात प्रवाशांना वाहतुकीबाबत कोणतीही अडचण उद्भवल्यास मदतीसाठी पोलीस नियंत्रण कक्ष, सिधुदुर्ग (०२३६२/२२८२०० मो.क्र. ८२७५७७६२१३) किवा जिल्हा वाहतुक शाखा, सिधुदुर्ग (मो.क्र. ९९२३१०७३२३) या नंबर वर संपर्क साधावा.
००००००
Comments
Post a Comment