आरोग्य शिबिराच्या आयोजनाबाबत बैठक संपन्न

सिंधुदुर्गनगरी, दि.21 (जि.मा.का.) : धर्मादाय आयुक्त कार्यालय व राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष यांच्या समन्वयाने आरोग्य शिबीर राबविण्यातबाबत आवाहन केलेले आहे. या शिबीरामध्ये रुग्णांचे निदान झाल्यास रुग्णांवर शासकीय योजना, धर्मादाय रुग्णांलय, शासकीय महाविद्यालय व रुग्णालये, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व संलग्नीत महाविद्यालये, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना यांच्या सहयोगातून दुर्बल घटक आरोग्य सेवांपासून उपेक्षित घटक या घटकापर्यत आरोग्य सुविधा व योजनाची माहिती पोचहवण्याकरीता धर्मादाय रुग्णालय व शासकीय महाविद्यालय अन्य आरोग्य संबंधित सहकार्याने समुदाय आरोग्य शिबीर राबविण्याबाबत सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, येथे सहायक धर्मादाय आयुक्त ए.जी. कुलकणी यांच्या अध्यतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीस कोकण समन्वयक डॉ. पुष्कर महाजन, समुदाय आरोग्य शिबीराचे कोकण समन्वयक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, निरीक्षक एम.जी. ठसाळे, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक चे प्रतिनिधी डॉ. पूजा कर्पे, महात्मा फुले जन आरोग्य जिल्हा प्रतिनिधी डॉ. प्रविण गोरुले, शिबिर नोडल अधिकारी डॉ. सौरभ पाटील, वैद्यकीय आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ. रामचंद्र चव्हाण, एच.एल.एल. लॅब जिल्हा प्रमुख प्रशांत जाधव, केतन कदम,स्टेमी (इसीजी) जिल्हा प्रमुख तसेच अशा संयोजक, आरोग्य सेवक, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य, विद्यापीठ, धर्मादाय रुग्णांलय व वैद्यकीय महाविद्यालय प्रतिनिधी या सभेला उपस्थित होते. कणकवली व सावंतवाडी उपजिल्हा रुग्णांलयाचे डॉक्टर व प्रिनिनिधी या सर्वाची विविध विषय व समस्या यावर सकारात्मक चर्चा झाली व येत्या महिन्याभरात जिल्हतून कमीत कमी 250 आरोग्य शिबीर घेऊन समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत वैद्यकीय सेवा पोचवणे याचा निधार करण्यात आला. बैठकीस आरोग्य शिबिराचे कोकण समन्वयक डॉ. पुष्कर महाजन यांचे मार्गदर्शन लाभले आहे. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'