अशासकीय पहारेकरी पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.20 (जि.मा.का.) : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे तात्परत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने माजी सैनिक प्रवर्गातून 1 अशासकीय पहारेकरी (बहुउद्देशीय MTS) स्वरुपाचे पद भरावयाचे आहे. तरी जिल्ह्यातील पात्र माजी सैनिकांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,येथे निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने एकंदरीत मानधनावर माजी सैनिक प्रवर्गातून माजी सैनिकाचे 1 अशासकीय पहारेकरी (बहूउद्देशीय MTS) स्वरुपाचे पद भरावयाचे आहे. उमेदवार हा सैन्य दलातून निवृत्त झालेला असावा व संगणक हाताळण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. तरी पात्र माजी सैनिकांनी सैन्यसेवा पुस्तक, ओळखपत्र, 2 फोटो, आधार कार्ड या कागदपत्रासंह दि. 26 सप्टेंबर 2024 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सिंधुदुर्ग येथे अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. 02362 228820,9322051284 वर संपर्क करावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. ००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'