मुख्यमंत्री युवाकार्यप्रशिक्षण रोजगार मेळव्याचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी दि 24 (जिमाका):- राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन 2024-25 आर्थिक वर्षापासून सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेमध्ये जास्तीत जास्त शासकीय तथा खाजगी आस्थापना यांचा सहभाग वाढावा म्हणून जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आले असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहायक आयुक्त गणेश चिमणकर यांनी दिली आहे. राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळविण्याची क्षमता वाढविण्यासाठी बारावी, डिप्लोमा, पदवी व पदयुत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या शिकाऊ उमेदवारांना अनुक्रमे प्रतिमाह 6 हजार , 8 हजार व 10 हजार विदयावेतन 6 महिन्याकरिता देण्यात येणार आहे. या योजनेमध्ये शासकीय, निमशासकीय आस्थापना उदयोग, महामंडळ या 5 टक्के मनुष्यवळाची मागणी करू शकतात. या योजनेअंतर्गत उदयोग आधार / उदयोग उद्यम यांच्याकडे नोंदणीकृत असलेल्या सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमातील (MSME) आस्थापनांना खालील प्रमाणात उमेदवार कार्यप्रशिक्षणासाठी रूजू करून घेता येतील. यामध्ये आस्थापनामध्ये किमान 10 मनुष्यबळ कार्यरत असेल तर 1 व 11 ते 20 मनुष्यबळासाठी 2 तसेच उदयोग आधार उदयोग उद्यम यांच्याकडे नोंदणीकृत MSME आस्थापनातील कार्यरत मनुष्यबळाची संख्या 20 पेक्षा अधिक असलेल्या उत्पादन (Manufacturing) व सेवा (Service) क्षेत्रातील आस्थापनांना त्यांच्याकडील कार्यरत मनुष्यबळाच्या अनुक्रमे 10 टक्के व 20 टक्के कार्यप्रशिक्षणासाठी रूजू करून घेता येतील. या योजनेमध्ये शासकीय तथा खाजगी आस्थापना यांचा सहभाग वाढावा म्हणून पुढीलप्रमाणे मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. अ.क्र दिनांक संस्थेचे नाव 1 24/09/2024 औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मालवण 2 25/09/2024 औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देवगड 3 25/09/2024 औद्योगिक प्रशिक्षण संस्था,फोंडाघाट 4 25/09/2024 औद्योगिक प्रशिक्षण संस्था,वेंगुर्ला 5 26/09/2024 औद्योगिक प्रशिक्षण संस्था,वैभववाडी 6 27/09/2024 औद्योगिक प्रशिक्षण संस्था,सावंतवाडी 7 27/09/2024 औद्योगिक प्रशिक्षण संस्था,ओरोस 8 27/09/2024 औद्योगिक प्रशिक्षण संस्था,दोडामार्ग तरी इच्छूक उदयोजक, खाजगी व्यवस्थापक, खाजगी अनुदानीत, विनाअनुदानित विद्यालय, महाविद्यालय, खाजगी सहकारी संस्था, जिल्हा उद्योग केंद्राकडे नोंदणीकृत उद्योजक, जिल्हा कामगार कार्यालयाकडे नोंदणीकृत उदयोजक यानी आपल्या आस्थापनेकडील एकुण मनुष्यबळाच्या उपरोक्त मर्यादेत या रोजगार मेळाव्यामध्ये जागाची नोंदणी करावी व आपणास इच्छूक असणाऱ्या उमेदवाराची निवड करावी. त्याचबरोबर जिल्हातील 18 ते 35 वयोगटातील प्रशिक्षण घेण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी आपल्या तालुक्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये नमुद रोजी शैक्षणिक कागदपत्राच्या छायाप्रतीसह उपस्थित रहावे व योजनेचा लाभ घ्यावा. पोलीस विभाग सिंधुदुर्ग यांचेकडील या योजनेअंतर्गत शिकाऊ उमेदवारांची 61 पदे रिक्त असून ओरोस औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये दिनांक 27 सप्टेंबर रोजी होणाऱ्या मेळाव्यामध्ये पदासाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे, तरी इच्छूक उमेदवारांनी प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था ओरोस यांच्याशी संपर्क साधावा. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'