एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आहार पुरविण्यासाठी ऑनलाईन निविदा 26 डिसेंबरपर्यंत भरावी
सिंधुदुर्गनगरी, दि.18 (जि.मा.का):सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना, प्रकल्प-सावंतवाडी येथील 3 ते 6 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना गरम ताजा आहार (HCM) अंगणवाडी निहाय पुरविण्यासाठी अनुभवी दर्जाधारक उत्पादक, अधिकृत पुरवठाधारकाडून ऑनलाईन पध्दतीने निविदा मागविण्यात येत असल्याची माहिती एकात्मिक बालविकास सेवा योजना, बाल विकास प्रकल्प अधिकारी (वर्ग-2) ममता देसाई यांनी दिली आहे.
सविस्तर निविदा विषय माहिती https://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर पहावयास उपलब्ध आहे. निविदा भरण्याची कार्यवाही ऑनलाईन असून निविदा सादर करण्याची अंतिम मुदत दि. 26 डिसेंबर 2023 रोजी 16 वाजेपर्यंत सादर करावेत.
०००००
Comments
Post a Comment