महाराष्ट्र स्टुडंन्ट इनोवेशन चॅलेंज स्पर्धेत 16 नवसंशोधकांनी संकल्पनाचे सादरीकरण
सिंधुदुर्गनगरी, दि.18 (जि.मा.का): नवसंशोधकांना आपल्या नविन्यपूर्ण संकल्पनाना मूर्तिमंत स्वरुप देण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी यांच्यामार्फत संपूर्ण राज्यभर राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र स्टुडंन्ट इनोवेशन चॅलेंज स्पर्धेत 16 नवसंशोधकांनी आपल्या संकल्पनाचे सादरीकरण केले आहे.
नवसंशोधकांना आपल्या नाविन्य पूर्ण संकल्पनांना मूर्तिमंत स्वरूप देण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मुंबई यांच्यामार्फत राज्यभरात राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र स्टुडंन्ट इनोवेशन चॅलेज स्पर्धेचे जिल्हास्तरीय सादरीकरण जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्ग कार्यालयामार्फत दि. 13 डिसेंबर रोजी 11 वाजता मेट्रोपॉलिटीन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅड मॅनेजमेंट कॉलेज, सुकळवाड येथे आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सूर्यकांत नवले, यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहाय्यक आयुक्त गणेश चिमणकर, जिल्हा कौशल्य विकास समन्वयक मयुरी परब, यंग प्रोफेशनल नितीन दवणे, इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हास्तरीय सादरीकरनाचे मुल्यमापन करण्यासाठी जुरी मेंबर म्हणून यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी प्राचार्य विजय जगताप, यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी सहयोगी प्राध्यापक प्रशांत माळी, ट्रेनिंग अॅड प्लेसमेंट ऑफिसर एम आय टी एम कॉलेज, सहाय्यक प्राध्यापक भाग्यश्री वाळके, शासकीय तंत्रनिकेतन सहायक प्राध्यापक योगेश महाडिक, टीएमटी हायस्कूल महाविद्यालय पूर्णवेळ शिक्षक प्रसाद सावंत, लेक्चरर सौरभ ठाकूर, कॉलेज ऑफ फार्मसी डिगस पुष्पसेन सावंत, संत राऊळ महाराज महाविद्यालय प्रशांत केरवडेकर, आदी उपस्थित होते.
या स्पर्धेकरिता एकूण 16 नवसंशोधकानी आपल्या संकल्पनांचे सादरीकरण केले. या सादरीकरणचे जुरी मेंबर कडून मूल्यमापन करण्यात आले असून त्यापैकी उत्कृष्ट 10 नव संकल्पानाची निवड करण्यात येणार आहे. विजेत्या स्पर्धकांना प्रत्येकी 1 लक्ष रुपयाचे बीज भांडवल महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मुंबई याच्यामार्फत देण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहाय्यक आयुक्त गणेश चिमणकर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन भाग्यश्री वाळके यांनी केले.
०००००
Comments
Post a Comment