कोरोना जेएन-वन व्हेरिएंट: पालकमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा चाचण्यांचे प्रमाण वाढवा, पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे निर्देश

सिंधुदुर्गनगरी, दि.22 (जि.मा.का):- देशात आणि राज्यात सध्या जेएन-वन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. यापार्श्वभूमीवर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज आरोग्य यंत्रणेची बैठक घेतली. चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, चाचण्या करण्यासाठी लागणाऱ्या तंत्रज्ञांची नेमणूक करावी, जिल्ह्यात पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवावा. नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करण्याचे निर्देश देखील पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील आदी उपस्थित होते. जिल्ह्यात कोविड तपासणी किट, ऑक्सिजन प्लांट्स, व्हेंटिलेटर, आरटीपीसीआर लॅब, या सर्व बाबी सुस्थितीत आहेत का याची तपासणी करावी व योग्य पद्धतीने ते कार्यान्वित आहेत की नाही याची खात्री करावी, नियमित माहितीचा dashboard बनवावा असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. बैठकीच्या सुरुवातीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी सद्यस्थिती, करण्यात येणाऱ्या उपाय योजना आणि औषधी साठ्याची माहिती पालकमंत्री यांना दिली. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'