'विकसित भारत संकल्प यात्रा' योजनांची माहिती देणारा चित्ररथ असणार येथे
सिंधुदुर्गनगरी, दि.12 (जि.मा.का.): विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध योजनांची प्रसिध्दी करण्यात येत आहे. संकल्प यात्रेच्या माध्यमातून योजनांची माहिती देणारा चित्ररथ 26 जानेवारी 2024 पर्यंत सर्व ग्रामपंचायतींना भेट देणार आहे. हा चित्ररथ बुधवार दि.13 डिसेंबर 2023 रोजी पुढील गावांत योजनांची माहिती देण्यासाठी फिरणार आहे. कुडाळ तालुक्यातील पुळास आणि नेरुर कर्यात नारुर, सावंतवाडी तालुक्यातील कास आणि पाडलोस, कणकवली तालुक्यातील हरकुळ ब्रुदूक आणि नागवे तर देवगड तालुक्यातील साळशी आणि चाफेड या गावांत योजनांची प्रसिध्दी करणार आहे. तरी लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा.
००००००
Comments
Post a Comment