मालवण तालुक्यातील मालवण राजकोट, तारकर्ली, सिंधुदुर्ग किल्ला क्षेत्रात तात्पुरते रेड झोन जाहीर

सिंधुदुर्गनगरी दि.3 (जि.मा.का.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विशेष सुरक्षा व्यवस्था असून यांच्या भेटी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये या करीता सिंधुदुर्ग जिल्हयात मौजे राजकोट, तारकर्ली, सिंधुदुर्ग किल्ला ता. मालवण या ठिकाणी भेट देणार असल्याने या तिन्ही कार्यक्रमाचे ठिकाणी Drone Rules 2021 मधील Rule 22 अन्वये पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांना प्राप्त अधिकारानुसार वरील नमुद ठिकाणी (Temporary Red Zone) No Fly Zone जाहीर केलेली आहेत अतिमहत्वाच्या व्यक्तीच्या उपस्थितीत होत असलेल्या कार्यक्रमाचे वेळी फोटोग्राफीसाठी कार्याक्रमाचे आयोजक व सहभागी यांच्याकडून ड्रोन उडविण्याची शक्यता नाकारता येत नाही. अतिमहत्वाच्या व्यक्तीच्या कार्यक्रमाचे ठिकाण किंवा इतर कोणतेही संवेदनशील ठिकाण हे Drone Rules 2021 मधील Rule 22 अन्वये 48 तासाकरीता तात्पुरते रेड झोन ( Temporary Red Zone) No Fly Zone म्हणून घोषित करता येवू शकते असे नमुद करण्यात आलेले आहे. खालीलप्रमाणे नमुद ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या दौरा कालावधीमध्ये दिनांक 3 डिसेंबर रोजी सकाळी 10.00 ते दि. 5 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 9 वाजेपर्यत (Temporaray Red Zone) No Fly Zone जाहीर करण्यात आलेला आहे. कार्यक्रमाचे ठिकाण कार्यक्रमाच्या ठिकाणचा अक्षांश कार्यक्रमाचे ठिकाणचा रेखांश तात्पुरता रेड झोन बनविण्याचा परिघ मालवण तालुक्यातील मौजे राजकोट, 16 06' 15"N 73 27' 30 E" 2000 मिटर मालवण तालुक्यातील तारकर्ली MTDC 16 00' 54"N 73 29' 21 "E 2000 मिटर मालवण तालुक्यातील सिंधुदुर्ग किल्ला 16 02' 34"N 73 27'24" "E 2000 मिटर 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'