नौकानयनशास्त्र व डिझेल इंजिन देखभाल, परिचालण प्रशिक्षणासाठी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करा

सिंधुदुर्गनगरी, दि.18 (जि.मा.का.): मत्स्यव्यवसाय विभागामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या सहा महिने मुदतीचे सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयनशास्त्र व डिझेल इंजिन देखभाल व परिचलण प्रशिक्षण दि. 1 जानेवारी 2024 पासून मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, मालवण येथे सुरु करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील मच्छीमार युवकांकडून 31 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छूक युवकांनी या प्रशिक्षण केंद्राशी किंवा सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन मत्सयव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी प्र.के.सुर्वे यांनी केले आहे. प्रशिक्षण तपशिल पुढीलप्रमाणे- प्रशिक्षण कालावधी, दि 1 जानेवारी 2024 ते 30 जून 2024. आवश्यक पात्रता, उमेदवारांचे वय 18 ते 35 वर्ष असावे. (आधारकार्ड व रेशनकार्ड छायाप्रत जोडणे ) किमान चौथी पास असणे आवश्यक आहे. ( शाळा सोडल्याच्या दाखल्याची छायाप्रत जोडणे ) क्रियाशील मच्छिमार असावा. (विहीत नमुन्यातील अर्जावर मच्छिमार सहकारी संस्थेची शिफारस घ्यावी.) उमेदवारास पोहता येणे आवश्यक आहे. प्रशिक्षण शुल्क:- सहा महिन्याचे रु.2700 मात्र एवढे असेल, दारिद्रय रेषेखालील असल्यास सहा महिन्याचे रु.600/- मात्र. (दारिद्रय रेषेखालील दाखला आवश्यक). रोजगार स्वयंरोजगाराच्या संधी:- राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC) अंतर्गत योजनेतून अर्थसाहाय्य घेवून नौका बांधता येते. सागरी नौकांवर पात्रतेनुसार खलाशी म्हणून रोजगाराच्या संधी उपलब्ध होवू शकतात. विहीत नमुन्यातील अर्ज उपलब्ध करुन देण्यात येईल. अर्ज स्वतःच्या हस्ताक्षरात भरुन त्यावर संस्थेची शिफारस घेवून दि. 31 डिसेंबर 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत कामकाजाच्या दिवशी कार्यालयास सादर करावेत. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालय बँक ऑफ इंडियाच्या समोर, सोमवार पेठ मालवण तसेच मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी प्र.के.सुर्वे मोबा. 7020590439 वर संपर्क साधावा. ००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'