ईव्हीएम- व्हीव्हीपॅट मशीन्सचा वापर व कार्य जनजागृती मोहिमेच्या मोबाइल व्हॅनचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते उद्घाटन

सिंधुदुर्गनगरी, दि.20 (जि.मा.का): सिंधुदुर्ग जिल्हयातील प्रत्येक मतदान केंद्रावर तसेच ग्रामपंचायत कार्यालय येथे मोबाईल व्हॅनव्दारे ईव्हीएम- व्हीव्हीपॅट मशीन्सचा वापर व कार्य याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते या मोबाईल व्हॅनच्या उद्घाटनाने झाली. या जनजागृती मोहिमेत ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीन्सबाबत मतदारांना संपूर्ण माहिती देण्यात येणार असून ही माहिती देण्यासाठी कर्मचारी वर्ग देखील नियुक्त करण्यात आलेला आहे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक-2024 च्या अनुषंगाने ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीन्सचा वापर व कार्ययाबाबत जनजागृती मोहिम .29 फेब्रुवारी 2024 पर्यंत मोबाईल प्रात्यक्षिक व्हॅनव्दारे राबविण्यात येणार आहे. तसेच जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी / मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात EVM प्रात्यक्षिक केंद्र (EDC) स्थापन करण्याबाबत देखील भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी सूचना दिलेल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग व मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कणकवली, कुडाळ, सावंतवाडी यांच्या कार्यालयात EVM प्रात्यक्षिक केंद्राची दिनांक 10/12/2023 रोजी स्थापना करण्यात आलेली असून मतदारांना ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीन्सचा वापर व कार्ययाबाबत माहिती देणेसाठी सदरील प्रात्यक्षिक केंद्रात प्रशिक्षीत कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. जिल्हयातील मतदारांनी जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग व मतदार नोंदणी अधिकारी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी यांच्या कार्यालयात स्थापन करण्यांत आलेल्या ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीन्स बाबतची माहिती घ्यावी तसेच जनजागृती मोहिमेत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणुक अधिकारी किशोर तावडे यांनी केले आहे. ००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'