पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे
सिंधुदुर्गनगरी, दि.21 (जि.मा.का): कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राज्यातील जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तसेच उद्योजकांना आवश्यक कुशल मनुष्यबळ प्राप्त होण्यासाठी राज्यातील नामांकित उद्योजक/इंडस्ट्रिज समवेत नागपूर येथे दि. ०९ व १० डिसेंबर, २०२३ रोजी राज्यस्तरीय पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या मेळाव्यात उपस्थित रहावे, असे आवाहन ग.पां.चिंमणकर, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सिंधुदुर्ग यांनी केले आहे.
राज्यातील उद्योजकांनी www.rojgar.mahaswayam.gov.in पोर्टलवर पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्यामध्ये आपली रिक्तपदे अधिसूचित करावीत. जिल्हयातील नोकरी साधक (Job Seeker) उमेदवारांनी वरील पोर्टलवर अधिसूचित रिक्त पदांसाठी आपल्या स्वतःच्या लॉगीन आयडीने शैक्षणिक पात्रतेनुसार संबंधित पदासाठी ऑनलाईन अर्ज करावे, किंवा दि. ०९ व १० डिसेंबर, २०२३ रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्यात उपस्थित रहावे.
अधिक माहितीसाठी संपर्क:- ०२३६२-२२८८३५ ईमेल आयडी :- sindhudurgrojgar@gmail.com संपर्क साधावा.
Comments
Post a Comment