मेरा युवा भारत पोर्टल वर नावनोंदणी करा

सिंधुदुर्गनगरी, दि.19 (जि.मा.का): युवा कार्यक्रम व क्रीडा विभाग, भारत सरकार नेहरु युवा केंद्र सिंधुदुर्ग या व्दारा संपूर्ण राज्यभर युवक युवतींचे मेरा युवा भारत पोर्टलवर ऑनलाईन (nyks) या पर्यायाला निवड करुन जिल्ह्यामधील 15 ते 29 वयोगटातील युवक, युवतींची नोंद करुन घ्यावी, असे आवाहन नेहरु युवा केंद्राच्या जिल्हा युवा अधिकारी मोहित कुमार सैनी यांनी केले आहे. देशातील तरुणांना मंत्रालये, सरकारी आणि खाजगी संस्था आणि शैक्षणिक संस्थांशी जोडते ज्यांचा उद्देश तरुणांना सामाजिक उपक्रमांमध्ये सहभगी होण्यासाठी, प्रायोगीक शैक्षणाव्दारे व्यावसायिक अनुभव प्राप्त करण्यासाठी आणि विविध प्रशिक्षण कार्यक्रम, जॉब वर्क इतर उपक्रम विषयी नवीन कौशल्य आत्मसात करण्याच्या संधी उपलब्ध करुन देण्याचे उद्देशाने हे पोर्टल तयार करण्यात आले आहे. युवा म्हणून नोंदणी करा आणि स्व विकासाच्या आणि राष्ट्र वाढीमध्ये सहभाग नोंदवा. तसेच महाविद्यालयात शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकत असणारे युवा- युवतींना माय भारत पोर्टलला www.mybharat.gov.in या वेबसाईट वरुन ऑनलाईन नोंदणी रजिस्ट्रेशन करीता प्रव्वृत करावे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील राष्ट्रीय युवा स्वयंसेवक,युथ क्लब, युवती मंडळ महिला बचत गट, पुरुष बचत गट, कनिष्ट व वरिष्ठ महाविद्यालयामध्ये जास्तीत जास्त नोंदणी करीता संपर्क साधून युवा चळवळीस व राष्ट्रीय उपक्रमामध्ये सहभाग नोंदून कार्यालयास सहकार्य करावे. ००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'