सिंधुदुर्गनगरी येथे 26 डिसेंबरला डाक अदालत
सिंधुदुर्गनगरी, दि.20 (जि.मा.का): पोष्टाच्या कार्यपध्दीतीविषी व कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींचे निवारण 26 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता अधीक्षक डाकघर सिंधुदुर्ग विभाग सिंधुदुर्गनगरी यांच्या कार्यालयामध्ये डाक अदालत घेतली जाणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग विभागाचे डाकघर अधिक्षक मयुरेश कोले यांनी दिली आहे.
यावेळी टपाल, स्पीड पोस्ट काऊटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, बचत बँक व मनिऑर्डर बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारीचा उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असवा. उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास पाठविली असेल त्यांचे नाव व हुद्दा ईत्यादी. संबंधितानी डाक सेवेबाबतची आपली तक्रार मयुरेश कोले, अधीक्षक डाकघर, सिंधुदुर्ग विभाग सिंधुदुर्गनगरी 416812 यांच्या नावे दि. 22 डिसेंबर 2023 पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहोचेल अशा रीतीने पाठवावी त्यानंतर आलेल्या तक्रारीची दखल घेतली जाणार नाही.
0000
Comments
Post a Comment