आरोग्य सुविधा अधिक बळकट करा -पालकमंत्री रवींद्र चव्हाण

सिंधुदुर्गनगरी दि 29 (जिमाका) : जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करणे अवश्यक आहे. यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे तत्काळ भरा, तसेच अद्यावत पॅथालॉजी लॅब तयार करुन गरजूंना अवश्यक त्या वैद्यकीय सुविधा पुरविण्याचे निर्देश पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आढावा बैठकीत दिले. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत वैद्यकीय महाविद्यालय येथे आढावा बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी किशोर तावडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, अधिष्ठाता डॉ. सुनीता रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, डॉ श्याम पाटील, माजी खासदार निलेश राणे आदी उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले, रुग्णांना वेळेवर उपचार मिळणे आवश्यक आहे. औषधसाठा पुरेसा ठेवावा, सुविधांबाबत नियमित आढावा घेण्यात यावा, पदभरती कंत्राटी पध्दतीने करा, एनएचआरएम मधून औषध खरेदी करा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची नाव पत्त्यासह यादी तयार करा ते कुठे जेवतात त्यांना येणारा खर्च याबाबत माहिती घ्या अशाही सुचना त्यांनी यावेळी दिल्या. 00000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'