संत काशिबा गुरव युवा व जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ कार्यरत
सिंधुदुर्गनगरी, दि.29 (जि.मा.का.): शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ मर्या. अंतर्गत राज्य शासनाने राज्यातील गुरव व विरशैव लिंगायत समाजाच्या आर्थिक विकासासाठी संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ व जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ या दोन उपकंपनीची स्थापना केली आहे. या दोन उपकंपनींची जिल्हास्तरीय कामकाज शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय सिंधुदुर्ग यांच्याकडून करण्यात येणार असल्याची माहिती शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक प्रिती पटेल यांनी दिली आहे.
या महामंडळामार्फत राज्यातील गुरव व विरशैव लिंगायत समाजातील गरजू पात्र व्यक्तींना महामंडळाच्या विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक विकास साध्य करण्याकरीता या महामंडळामधून स्वय:रोजगार करीता आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे. महामंडळाचे कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सिंधुदुर्गनगरी येथे असून अधिक माहितीसाठी 02362 228119 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. जिल्ह्यातील गुरव व लिंगायत बांधवांनी या महामंडळाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक प्रिती पटेल यांनी केले आहे.
००००००
Comments
Post a Comment