मुंबईतून आलेल्या जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णाचा मृत्यू - जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

मुंबईतून आलेल्या जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णाचा मृत्यू
                                                - जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि. 29 –  देवगड तालुक्यातील टेंबवली येथील कोरोना बाधीत 79 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. सदर महिला दिनांक 19 मे रोजी मुंबई येथून जिल्ह्यात आली होती. त्यानंतर तिला दुसऱ्यादिवशी रुग्णालयामध्ये दाखल करून तिचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला होता. दिनांक 23 मे 2020 रोजी तिचा मृत्यू झाला होता. तिचा कोरोना चाचणी अहवाल आज पॉजिटीव्ह आला आहे. तिला उच्च रक्तदाब व जुनाट श्वसनाचा आजार होता.
आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आढळलेल्या कोरोना बाधीत रुग्णांची माहिती पुढील प्रमाणे आहे. कणकवली तालुक्यातील बावशी येथील एक, कुडाळ तालुक्यातील कवठी येथील एक, देवगड तालुक्यातील वाडा येथील एक, वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड येथील एक आणि सावंतवाडी तालुक्यातील बांदा येथील एक आणि देवगड तालुक्यातील टेंबवली येतील मृत्यू झालेल्या महिलेचा एक असे एकूण 6 अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची एकूण संख्या 30 इतकी झाली आहे. या पैकी 7 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 22 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नव्याने कोरोना बाधीत आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या सर्व रुग्णांनी मुंबई येथून प्रवास केला आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'