जिल्ह्यात सद्यस्थितीत दोन कंटेन्मेंट झोन
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 19 - सध्या
जिल्ह्यात 2 ठिकाणी कन्टेंनमेंन्ट झोन असून कोरोना प्रतिंधात्मक कार्यवाही चालू
आहे. यामध्ये नेरुर, कुडाळ आणि वाडा देवगड या ठिाकणाचा समावेश असुन सदरच्या नवीन 3
पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्यांच्या संपर्कात आलेल्या 51 अतिजोखमीच्या व्यक्तीचे
नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आलेले असून सदरच्या व्यक्तींना संस्थात्मक अलगीकरण
करणेत आलेले आहे. यापैकी 27 जणांचे तपासणी अहवाल प्राप्त झालेले असून ते निगेटिव्ह
आहेत. उर्वरीत 24 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.
जिल्ह्यात एकूण 1 हजार 260 व्यक्ती
अलगीकरणात आहेत. त्या पैकी 746 व्यक्तींना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले असून 514
व्यक्ती या संस्थात्मक अलगीकरणात आहेत. जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 1 हजार 114
नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 976 तपासणी अहवाल प्राप्त झाले
आहेत. त्यातील 8 अहवाल पॉजिटीव्ह आले असून उर्वरीत 968 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून
138 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण
कक्षात सध्या 101 रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी 55 रुग्ण डेडिकेटेड कोवीड
हॉस्पिटलमध्ये, 33 रुग्ण डेडिकेटेड कोवीड हेल्थ केअर सेंटर मध्ये, 13 रुग्ण कोवीड
केअर सेंटरमध्ये दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत आज रोजी 6 हजार 289 व्यक्तींची
तपासणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात आढळलेल्या 8 कोरोना बाधीत रुग्णांपैकी 4 रुग्ण
विलगीकरण कक्षामध्ये दाखल असून 4 रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत.
परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्ह्यातून सिंधुदुर्ग
जिल्ह्यात आज अखेर एकूण 24 हजार 555 व्यक्ती दाखल झाल्या आहेत.
00000
Comments
Post a Comment