जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या गरोदर माता, वृद्ध व अपंग यांना ठेवणार गृह अलगीकरणात - जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी
जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या गरोदर माता, वृद्ध व अपंग यांना
ठेवणार गृह अलगीकरणात
-
जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी
सिंधुदुर्गनगरी
(जि.मा.का.) दि. 14 – सध्या
जिल्ह्यामध्ये मुंबई, पुणे व अन्य जिल्ह्यातील बाधीत क्षेत्रातून येणाऱ्या व्यक्तींना
सध्या अलगीकरणात ठेवण्यात येत आहे. या प्रवाशांमध्ये गरोदर माता, स्तनदा माता, पाच
वर्षाखालील मुले व त्यांच्या माता, 60 वर्षांवरील वृद्ध, अपंग व दुर्धर आजाराने ग्रस्त
व्यक्तींचाही समावेश आहे. त्या अनुषंगाने आशा व्यक्तींची तपासणी करुन अटी व शर्तींच्या
अधीन राहून 28 दिवस गृह अलगीकरणात ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी
आज दिले आहेत.
गृह अलगीकरणात ठेवण्यात आलेल्या अशा व्यक्तींच्या
आरोग्याचा पाठपुरावा आरोग्य कर्मचारी यांनी करावयाचा आहे. तसेच त्यांच्यामध्ये काही
लक्षणे आढळल्यास त्यांना तात्काळ नजीकच्या आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात येणार
आहे.
तसेच ज्या व्यक्तींना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन
केले आहे त्या व्यक्ती जर उपविभागीय अधिकारी यांनी अधिग्रहीत केलेल्या पेड क्वारंटाईन
सेंटरमध्ये जाण्यास इच्छुक असतील तर इन्सिटंड कमांडर यांच्याशी समन्वय साधून त्या व्यक्तींना
पेड क्वारंटाईनमध्ये पाठवावे असेही आदेश देण्यात आले आहेत.
देवगड तालुक्यातील वाडा येथील कन्टेंन्मेंट झोनमधील सर्व
नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तीन किलोमीटरच्या या कन्टेन्मेंट झोनमध्ये वाडा,
नाडन आणि पुरल या गावांचा समावेश होता. 19
पथकांनी 822 घरांमधील 945 कुटुंबातील एकूण 3 हजार 697 व्यक्तींची आरोग्य तपासणी केली.
या तपासणी सर्वेक्षणामध्ये एकही व्यक्ती बाधीत झाली नसल्याचे दिसून आले. तसेच वाडा,
ता. देवगड येथील कोरोना बाधीत महिलेच्या संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या व्यक्तींचे
नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल येणे बाकी आहे.
सद्यसिथितीत जिल्ह्यात एकूण 1 हजार 60 व्यक्ती अलगीकरणात
असून 684 व्यक्ती गृह अलगीकरणात तर 376 व्यक्तींना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले
आहे. जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 928 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी
849 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 5 अहवाल पॉजिटीव्ह आले असून उर्वरीत
844 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 79 नमुन्यांचा
अहवाल प्राप्त झालेला नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात सध्या
118 रुग्ण दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत आज रोजी 6 हजार 163 व्यक्तींची तपासणी करण्यात
आली आहे. जिल्ह्यात आढळलेल्या 5 कोरोना बाधीत रुग्णांपैकी तीन रुग्ण विलगीकरण कक्षामध्ये
दाखल असून इतर दोन रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत.
परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्ह्यातून
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिनांक 13 मे 2020 रोजी 1 हजार 245 व्यक्ती दाखल झाल्या असून
आज अखेर जिल्ह्यात एकूण 5 हजार 396 व्यक्ती दाखल झाल्या आहेत. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून
बाहेर जाण्यासाठी आज जिल्हा प्रशासनातर्फे 321
पासेस देण्यात आले आहेत.
00000
Comments
Post a Comment