राज्य शासनाचा मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम कमाल 50 लाख रुपयांपर्यंत मिळणार अर्थसहाय्य

राज्य शासनाचा मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम
कमाल 50 लाख रुपयांपर्यंत मिळणार अर्थसहाय्य
            युवकांच्या सर्जनशीलतेला वाव मिळून स्वयंरोजगारासाठी पोषक वातावरण निर्माण व्हावे. याद्वारे ग्रामीण तसेच शहरी भागात सुक्ष्म, लघु उपक्रमातून रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी आर्थिक सहाय्यातून प्रकल्प उभारणीस हातभार लावण्याचाही उद्देश या योजनेमध्ये आहे.
            या योजनेच्या अटी पुढील प्रमाणे आहेत. उमेदवार हा राज्याचा रहिवासी असावा, तो 18 ते 45 या वयोगटातील असावा, अनुसुचित जाती, जमाती, महिला, अपंग, माजी सैनिक यांच्यासाठी वयाची अट 5 वर्षांसाठी शिथील आहे. 10 लाख रुपये मर्यादेपर्यंतच्या प्रकल्पासाठी शिक्षणाची अट नाही, तर 10 लाख रुपयांवरील उपक्रमांसाठी किमान शैक्षणिक पात्रता ही 7 वी पास आहे. 25 लाख रुपयांवरील प्रकल्पांसाठी उमेदवार किमान 10 वी पास असावा. अर्जदाराने यापूर्वी राज्य, केंद्र शासनाच्या कोणत्याही अनुदान समाविष्ट असलेल्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
            या योजनेसाठी नकारात्मक यादीतील उद्योग वगळता सर्व उत्पादन व प्रक्रिया उद्योग तसेच सेवा, कृषी पुरक उद्योग पात्र असणार आहेत. नकारात्मक यादीतील उद्योग पुढील प्रमाणे आहेत. प्रदूषणकारी उद्योग, प्लास्टिक पिशवी निर्मिती, तंबाखू, सिगारेट, मद्य, मांस प्रक्रिया, वाहतूक सेवा, ( ई-वाहने वगळून) नर्सरी, डेअरी, पोल्ट्री, पिगरी, गोटरी, मधुमक्षिका पालन, सेरिकल्चर इत्यादी.
            या योजनेची संपूर्ण अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. यासाठी maha-cmegp.gov.in हे विशेष पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. या पोर्टलवर अर्ज करताना स्पॉन्सरिंग एजन्सी ( Sponsoring Agency)  या रकान्यामध्ये डीआयसी (DIC) हा पर्याय निवडणे आवश्यक आहे. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज परस्पर संकेतस्थळावर दाखल करावेत.
            अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी जिल्हा उद्योग केंद्र, सिंधुदुर्ग या कार्यालयाशी दूरध्वनी क्रमांक 02362-228705 किंवा ई-मेल – didic.sindhudug@maharashtra.gov.in वर संपर्क साधावा असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.
00000


Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'