जिल्ह्यात एकूण 16 हजारांपेक्षा जास्त व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात - जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

जिल्ह्यात एकूण 16 हजारांपेक्षा जास्त व्यक्ती
संस्थात्मक अलगीकरणात
-         जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी
सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि. 23 - जिल्ह्यात एकूण 16 हजार 378 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात असून त्या पैकी 515 व्यक्ती या शासकीय संस्थात्म अलगीकरण कक्षात आहेत. तर गावपातळीवर 15 हजार 863 व्यक्तींना गावपातळीवरील अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर जिल्ह्यात प्रवेश केलेल्या  इतर सर्व नागरिकांना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 1 हजार 307 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 1 हजार 142 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 16 अहवाल पॉजिटीव्ह आले असून उर्वरीत 1 हजार 126 अहवाल निगेटीव्ह आले आहेत.  अजून 165 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात सध्या 85 रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी 52 रुग्ण डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटलमध्ये, 33 रुग्ण डेडिकेटेड कोवीड हेल्थ केअर सेंटरमध्ये दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत आज रोजी 4 हजार 996 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सहाव्या रुग्णाच्या संपर्कातील 4 व्यक्तींचे अहवाल प्रलंबीत असून इतर सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर सातव्या आणि आठव्या रुग्णाच्या संपर्कातील सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दि.  2 मे 2020 पासून आज अखेर एकूण 36 हजार 628 व्यक्ती दाखल झाल्या आहेत. त्यामध्ये खारेपाटण चेकपोस्ट येथून 26 हजार 935, फोंडा – 1 हजार 963, करुळ – 3 हजार 320, आंबोली – 1 हजार 587, बांदा – 1 हजार 740, दोडामार्ग – 783 व्यक्तींनी जिल्ह्यात प्रवेश केला आहे.

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'