कंटेन्मेंट झोनमधून येणाऱ्यांना संस्थात्मक तर इतर क्षेत्रातून येणारे गृह अलगीकरणात - जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी


कंटेन्मेंट झोनमधून येणाऱ्यांना संस्थात्मक
तर इतर क्षेत्रातून येणारे गृह अलगीकरणात
-         जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी
            याविषयी नव्याने दिलेल्या आदेशांप्रमाणे, बाहेरून जिल्ह्यात प्रवेश करणारे नागरिक कंटेन्मेंट झोनमधून आले असल्यास त्याचे स्वतःचे राहते घर स्वतंत्र, विलग असल्यास तशी खात्री करून त्यास गृह अलगीकरण करावे. तसे नसल्यास ग्राम, वॉर्ड समिती यांनी निश्चीत केलेल्या ठिकाणी त्यांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवावे. अलगीकरणातील व्यक्ती गावात, शहरात कोठेही विनाकारण फिरणार नाहीत याची दक्षता घ्यावी. तसेच अशा व्यक्ती फिरताना आढळल्यास नजीकच्या पोलीस ठाण्यास कळवावे व त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व साथ रोग नियंत्रण कायदा 1897 नुसार कारवाई करण्यात यावी. अलगीकरणातील व्यक्तीस कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्यांना तात्काळ जवळच्या कोवीड केअर सेंटर, कोवीड हेल्थ केअर सेंटरमध्ये दाखल करावे व वैद्यकीय अधिकारी यांनी जिल्हा शल्य चिकित्सक व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या समन्वयाने स्वॅब तपासणीची कार्यवाही करावी. संस्थात्मक विलगीकरणाच्या ठिकाणी वेळोवेळी निर्जंतुकीकरण करावे.
स्वॅब तपासणीच्या सूचना
            बाहेरून आलेल्या प्रवाशांमध्ये सर्दी, ताप , खोकला, श्वसनाचा त्रास अशी लक्षणे आढळल्यास अशा व्यक्तींचा स्वॅब, जिल्हा शल्य चिकित्सक व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनानुसार, घेण्यात यावा. ज्या व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉजिटीव्ह येईल, अशा व्यक्तींच्या आजारपणाची लक्षणे, तीव्रता लक्षात घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांनी संबंधितास कोवीड केअर सेंटर, कोवीड हेल्थ केअर सेंटर किंवा डेडीकेटेड कोवीड हॉस्पिटल येथे ठेवण्याबाबत शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार कार्यवाही करावी.  
तपासणी नाक्याबाबतचे आदेश
            बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची नाक्यावरील तैनात अधिकारी व कर्मचारी यांनी परवाना तपासून सदर परवाना संबंधित कार्यालयाकडूनच दिला असल्याची खात्री करावी. येणाऱ्यांची आरोग्य तपासणी करावी. यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यास जिल्हा शल्य चिकित्सक व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी संपर्क साधून त्यांना जवळच्या सीसीसी, डीसीएचसी येथे स्वॅब तपासणीसाठी पाठवावे. गावात येणाऱ्या बाहेरील प्रवाशांकडून विलगीकरणासंबंधीच्या सूचनांचे पालन करण्याबाबत हमी पत्र घ्यावे. प्रवशांची माहिती संकलीत करून गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांना त्वरीत कळवावे, सदरची माहिती प्राप्त होताच संबंधीत यंत्रणांनी ही माहिती ग्राम, वॉर्ड नियंत्रण समितीकडे तात्काळ पाठवावी.  जिल्हा परिषद व नगरपालीका      प्रशासनाने त्यांच्या कार्यालयात हेल्पलाईन सुरू करावी. तसेच तपासणी नाक्यावरून गाव व शहरामध्ये येणाऱ्या प्रवाशांची माहिती ग्राम, वॉर्ड नियंत्रण समितीला तातडीने कळविण्यासाठी गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी यांच्या स्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात यावा. या नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून येणारा प्रवासी हा बाधीत क्षेत्रातून आला आहे किंवा कसे? याची अद्ययावत माहिती ग्राम, वॉर्ड स्तरीय नियंत्रण समितीस देण्यात यावी.
00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'