गृह व संस्थात्मक विलगीकरण 14 दिवस --- जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी
गृह व संस्थात्मक विलगीकरण 14 दिवस
--- जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी
सिंधुदुर्गनगरी
(जि.मा.का.) दि. 28 : कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर विलगीकरणाबाबत
शासनाकडून आता 14 दिवस गृह व संस्थात्मक विलगीकरण करण्याच्या सुचना देण्यात आल्या
आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा
जिल्हादंडाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
जिल्ह्यातील बाधित क्षेत्रामधून (Containment
Zone) येणा-या लोकांना 14 दिवस संस्थात्मक विलगीकरण (Institutional Quarantine) करण्यात येणार आहे. तर बाधित
क्षेत्र वगळून इतर क्षेत्रामधून येणा-या लोकांना 14 दिवस गृह विलगीकरण (Home
Quarantine) करण्यात येईल. बाधित क्षेत्रामधून (Containment
Zone) येणा-या लोकांची राहते घर स्वतंत्र, विलग असल्यास अशा लोकांना
ग्राम व वॉर्ड समितीने त्याबाबत खात्री करुन गृह विलगीकरण (Home Quarantine) करण्यात यावे.
गृह विलगीकरण (Home Quarantine) करण्यात आलेल्या व्यक्तींनी गृह विलगीकरणाच्या नियमांचे उल्लंघन
केल्यास अशा व्यक्तींना पहिल्या वेळेस 500 रुपये दंड असून, दुस-या वेळेस 1 हजार रुपये दंड आकारण्यात येईल
शिवाय त्या व्यक्तींची रवानगी संस्थात्मक विलगीकरण केंद्रात करण्यात येईल. ग्राम व वॉर्ड स्तरीय समितीने या नियमांचे
उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींकडून वरीलप्रमाणे दंड आकारुन दंडाची रक्कम स्थानिक
प्राधिकरणाकडे जमा करावी. सदर रक्कमेचा
विनियोग कोव्हिड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी वापरण्यात येणार आहे. कोणतीही व्यक्ती, संस्था व संघटना यांनी या
नियमांचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 नुसार
दंडनिय कायदेशीर कार्यवाहीला पात्र राहतील तसेच कार्यवाहीला ग्राम व वॉर्ड स्तरीय
नियंत्रण समितीस प्राधिकृत करण्यात आले आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात
आले आहे.
0000
Comments
Post a Comment