टोमॅटो पिकावर नवीन तिरंगा विषाणुचा प्रादुर्भाव होत नाही ---- कृषि संचालक शिरीष जमदाडे


टोमॅटो पिकावर नवीन तिरंगा विषाणुचा प्रादुर्भाव होत नाही
                                 ---- कृषि संचालक शिरीष जमदाडे            
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि. 19  : राज्यात टोमॅटो या भाजीपाला पिकाची लागवड प्रामख्याने नाशिक, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, नागपूलातूर या जिल्हयात करण्यात येते. टोमॅटो पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र 33 हजार 950 हेक्टर असू, त्यापासू  8 लाख 48 हजार 550 मे.टन इतके उत्पादन मिळते. तसेच टोमॅटो पिकावर नवीन तिरंगा विषाणुचा कोणताही प्रादुर्भाव होत नाही, अशी माहिती पुणे कृषि आयुक्तालय विभागचे संचालक शिरीष जमदाडे यांनी दिली.
            शासनाच्या कृषि व सहकार विभागास नवीन निरंगा विषाणुजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे अहमदनगर जिल्हयातील टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली होती. तसेच अहमदनगर जिल्हयातील संगमनेर व अकोला या तालुक्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी टोमॅटोवरील नवीन तिरंगा विषाणुजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे त्रस्त झाल्याबाबत वृत्त प्रसिद्ध झाले होते. या प्रकरणी वस्तुस्थिती तपासण्यासाठी  राज्यस्तरावरुन क्षेत्रिय स्तरावरील कृषि विभाग व वनस्पती शास्त्रज्ञ, महात्मा फुले कृषि विद्यापिठ राहुरी यांना या प्रकरणाचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या.   
महात्मा फुले कृषि विद्यापिठ राहुरी येथील वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. तानाजी नरुटे, यांनी या विषाणुबाबतची पडताळणी केली असता, वनस्पतीमधील विषाणुचा प्रादुर्भाव मनुष्यावर होत नाही. त्यामुळे मानुष्यावरील व वनस्पतीवरील विषाणू हे वेगवेगळ्या प्रकारचे असून ते एकमेकांवर हस्तक्षेप करित नाहीत, असे वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. नरुटे यांनी स्पष्ट केले. तरी राज्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी अशा नवीन तिरंगा विषाणुबाबतच्या अफवांवर विश्वास  ठेवू नये, असे आवाहन कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी केले.
००००



Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'