जिल्ह्यात आणखी आठ जणांचे कोरोना अहवाल पॉजिटीव्ह
-         जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी
सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि. 23 - जिल्ह्यात आज आणखी 8 जणांचे कोवीड – 19 तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. त्यामध्ये कणकवली तालुक्यातील 6 जणांचा, वैभववाडी तालुक्यातील 1 आणि मालवण तालुक्यातील एका व्यक्तीचा समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे.
 कणकवली येथील 4 रुग्णांनी मुंबई येथून प्रवास केला आहे. तर दोन व्यक्तींनी रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथून प्रवास केला आहे. मालवण तालुक्यातील रुग्ण हा ठाणे येथून आलेला आहे. वैभववाडी तालुक्यातील रुग्ण हा प्रभादेवी मुंबई येथून आलेला आहे. या नवीन 8 रुग्णांमध्ये 4 महिला व 4 पुरुषांचा समावेश आहे. या सर्वांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे. 8 नवीन कोरोना बाधीत रुग्ण सापडल्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या आता 16 झाली आहे. यातील 5 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आता 11 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'