लॉकडाऊन काळात बेकायदेशीक कृत्यांना आळा घालण्यासाठी सिंधु पोलीस ॲपची निर्मिती

लॉकडाऊन काळात बेकायदेशीक कृत्यांना आळा घालण्यासाठी
सिंधु पोलीस ॲपची निर्मिती
सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि. 22 – लॉकडाऊनच्या काळात जमावबंदीचे उल्लंघन, अनधिकृत स्थलांतर, विध्वसंक वर्तन, संशयास्पद हलचाली किंवा इतर बेकायदेशीर कृत्य तसेच अलगीकरणाचे नियम न पाळणाऱ्यांची माहिती पोलीसांना तात्काळ देता यावी यासाठी सिंधुदुर्ग पोलीस दलाच्यावतीने सिंधु पोलीस (Sindhu Police)  हे ॲप तयार करण्यात आले आहे.
या ॲपच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिक एखाद्या बेकायदेशीर कृत्याचे फोटो काढून तात्काळ जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षास कळवू शकणार आहेत. नागरिकांनी पाठविलेल्या फोटोसोबत अक्षांश व रेखांश यांची सुविधा उपलब्ध असल्याने पोलीस नियंत्रण कक्षास सदर कृत्य कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडत आहे याबाबत अचूक माहिती मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 30 सेक्टर पेट्रोलिंग वाहनांपैकी जवळच्या वाहनास संपर्क साधून संबंधित ठिकाणी पोलीस पथक तात्काळ पाठवून बेकायदेशीर कृत्यास आळा घालणे शक्य होणार आहे.
            Sindhu Police हे ॲप्लीकेशन गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध असून त्याची लिंक https://play.google.com/store/apps/details?id=com.sindhu.police अशी आहे. सदर ॲप सहज डाऊनलोड करता यावे यासाठी https://rebrand.iy/sindhupolice ही सोपी लिंक तयार करण्यात आली आहे.
तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी सिंधु पोलीस ॲप डाऊनलोड करून आपल्या समोर घडत असलेल्या बेकायदेशीर कृती तात्काळ जिल्हा पोलीस दलास करवून कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'